शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

जुने महसुली रेकॉर्ड जीर्ण

By admin | Updated: July 25, 2014 00:04 IST

सुमारे १००-१५० वर्षांपूर्वीचे जुने महसुली रेकॉर्ड आता पूर्णपणे जीर्ण झाले आहे. या रेकॉर्डचे संगणकीकरण करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा हे रेकॉर्ड नेस्तनाबूत होण्याचा धोका वाढला आहे.

नांदेपेरा : सुमारे १००-१५० वर्षांपूर्वीचे जुने महसुली रेकॉर्ड आता पूर्णपणे जीर्ण झाले आहे. या रेकॉर्डचे संगणकीकरण करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा हे रेकॉर्ड नेस्तनाबूत होण्याचा धोका वाढला आहे.महसूल सोबतच कोणत्याही कार्यालयात जुने रेकॉर्ड जपून ठेवले जाते. मात्रा हे रेकॉर्ड अत्यंत जीर्ण झाले आहे. कागदपत्रांच्या गठ्ठ्यांमधून व्यवस्थित कागद काढणे कठीण झाले आहे. अनेकांना जुन्या रेकॉर्डची गरज भासते. विविध दाखल, प्रमाणपत्रे काढण्यासाठी जुने रेकॉर्ड उपयोगी पडते. एखाद्या नागरिकाने रेकॉर्ड मागणीकरिता अर्ज सादर केल्यानंतर त्याला ते कागदपत्र देताना पाने फाटलेली आढळतात. अनेक शासकीय कार्यालयांमध्ये रेकॉर्ड ठेवलेल्या खोलीमध्ये पावसाळ्यात पाणी गळते. त्यामुळे जुने रेकॉर्ड आता अत्यंत खराब झाले आहे़ त्यामुळे संबंधित रेकॉर्ड लिपीकाकडून रेकॉर्ड जीर्ण असल्यामुळे नक्कल पुरविता येत नाही, अशी उत्तरे मिळतात़ अनेकदा ग्रामस्थांना १0 वर्षांपूर्वी ज्या रेकॉर्डची प्रत काढली, त्याची पुन्हा प्रत काढण्यासाठी मागणी केली असता ते रेकॉर्डच जागेवर आढळून येत नाही. परिणामी नेमके ते रेकॉर्ड कुठे गेले, त्या पानांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे़रेकॉर्ड गहाळ होण्यास संबंधित लिपीकही जबाबदार नसतो़ अनेक वर्षात अनेक लिपीकांच्या हातून ते रेकॉर्ड गेलेले असते. पाने चाळताना ते कागदपत्र आणखी जीर्ण होतात. त्यामुळे कागदपत्रांचा चुरा होतो. मात्र रेकॉर्ड मिळत नसल्याने जनतेचे हाल होतात. जन्मनोंद, कोतवाल बुकाची नक्कल, हक्क नोंदणी हा जुना पुरावा जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्राकरिता मागण्यात येतो. त्याच पुराव्याच्या आधारे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते. वर्षानुवर्षे ही कागदपत्रे तहसीलमध्ये बांधून पडलेली असतात. जागीच ती जीर्ण होतात. अनेकदा तर त्यांचा भुगा पडतो. त्यामुळे नागरिकांना त्याची नक्कल मिळणे अनेकदा कठीण जात असते. (वार्ताहर)