शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी-कर्मचारी मस्त, शेतकरी त्रस्त

By admin | Updated: September 18, 2014 00:09 IST

अनेक शासकीय कार्यालयात सामान्य जनतेच्या विविध समस्या प्रलंबित आहेत़ सामान्य नागरिकांचे वेळेत काम होत नाही़ मात्र कर्मचारी आणि अधिकारी मस्त असून सामान्य माणूस हवालदिल झाला आहे.

वणी : अनेक शासकीय कार्यालयात सामान्य जनतेच्या विविध समस्या प्रलंबित आहेत़ सामान्य नागरिकांचे वेळेत काम होत नाही़ मात्र कर्मचारी आणि अधिकारी मस्त असून सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. अनेक विभागात तर दलाल सक्रिय झाल्याने सामान्य जनतेची लूट सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.सामान्य नागरिकाला विविध शासकीय कार्यालयात दररोज येरझारा माराव्या लागतात. सामान्य नागरिक आपले रोजीरोटीचे काम सोडून ‘साहेब, माझे काम करून द्या’, अशी विनवणी करीत असतो़ परंतु साहेब, लिपीक, कर्मचाऱ्यांना त्या सामान्य नागरिकांचे काहीच घेणेदेणे नसते. जनतेच्या समस्यांमागील साधे कारणही जाणून घेण्याचा प्रयत्न अधिकारी, कर्मचारी करीत नसल्याचे दिसून येते. सध्या शेतकरी पूर्णपणे संकटात सापडले आहे़ त्यांची मुले महाविद्यालयीन, प्राथमिक शिक्षण घेत आहे़ शेतकरी आपल्या पाल्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी कागदपत्रे मिळण्याकरिता तहसील कार्यालयात चकरा मारतात़ मात्र ते जेव्हा कार्यालयात पोहोचतात, तेव्हापासूनच दलाल सक्रिय होऊन त्यांना गाठतात़ त्यांना कागदपत्रे त्वरित काढून देऊ, अशी बतावणी करून त्यांची आर्थिक लूट करतात.तहसील परिसरातील काही अधिकृत आणि काही अनधिकृत अर्जनविसही विविध कागदपत्रांसाठी नागरिकांची आर्थिक लूट करताना दिसतात. या लुटीत काही लिपीकही सहभागी दिसतात. सेतू केंद्रात काम करणारे काही कर्मचारीही त्यात सहभागी होतात. मात्र सर्वच अधिकारी, कर्मचारी सारखे नसतात. काही अधिकारी, कर्मचारी कर्तव्यदक्षपणे कामही करतात. परंतु कामचुकार आणि लोभी लिपीकांमुळे प्रामाणिक अधिकारी, कर्मचारी बदनाम होतात.काही अधिकारी, कर्मचारी नेहमी जनतेची कामे काम करण्यास तत्पर असतात. मात्र संबंधित लिपीक, सेतू कर्मचारी यांच्यामुळे अधिकाऱ्यांना नामुष्कीला सामोरे जावे लागते. काही ठिकाणी तर सर्व सामान्य नागरिकांचे कामच होत नाही़ तथापि, लोभी कर्मचारीही अत्यंत हुशार असतात. जे नागरिक वरिष्ठांपर्यंत तक्रारी करू शकतात, त्यांची कामे ते जलदगतीने करून देतात़ त्यामुळे आपल्याविरूध्द कुणी तक्रार करू नये, याची ते दक्षता घेताना दिसतात. (कार्यालय प्रतिनिधी)