शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

मजुरी करून बारावीत मिळविले ८२ टक्के

By admin | Updated: May 28, 2016 02:31 IST

घरी भौतिक सुखसुविधांची ददात. शिकवणी लावायला पैसा नाही. प्रसंगी महाविद्यालयातही पायी जाण्याचीच वेळ. घरी अठराविश्वे दारिद्र्ये.

वैष्णव ढाकुलकर : स्पर्धा परीक्षा हेच ध्येयआर्णी : घरी भौतिक सुखसुविधांची ददात. शिकवणी लावायला पैसा नाही. प्रसंगी महाविद्यालयातही पायी जाण्याचीच वेळ. घरी अठराविश्वे दारिद्र्ये. अशा परिस्थितीत एखाद्या विद्यार्थ्याने बारावी उत्तीर्ण करणे कठीणच. पण तालुक्यातील एका विद्यार्थ्याने याहूनही भयंकर परिस्थितीवर मात करीत ८२.३० टक्के गुण मिळविले आहेत. वैष्णव विलास ढाकुलकर असे या मेहनती विद्यार्थ्यांचे नाव आहे. आर्णीपासून पाच किलोमीटर अंतरावरील काठोडा या छोट्याशा खेड्यात तो राहतो. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. काठोडा येथून आर्णी येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी तो पायी येत होता. शिक्षणासाठी पैसा लागणार म्हणून तो रोजमजुरी करायचा. वाणिज्य शाखेत शिकत असताना अभ्यासावर त्याचे संपूर्ण लक्ष केंद्रित होते. वेळ मिळताच मजुरीचे काम करून तो शिक्षणासाठी पैसे जमवित होता. त्याचे वडील नागपूरला खासगी काम करतात. आई गावातील अंगणवाडीत काम करते. त्याचा त्रास पाहून काकाने त्याला सायकल घेऊन दिली. यापूर्वी दहावीतसुद्धा त्याने ८० टक्के गुण मिळविले होते. यापुढील शिक्षणही स्वत:च्या मेहनतीवरच घ्यायचे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनायचे, असे ध्येय त्याने उराशी बाळगले आहे. (शहर प्रतिनिधी)