शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमधील नर्सेसचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST

वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिका संवर्गातील सर्वच स्तरातील पदोन्नती, पदनिर्मिती व पदभरती कायमस्वरूपी करावी, केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता नव्याने मंजूर करावा, सर्व परिचारिकांना सरसकट सात हजार २०० रुपये प्रतिमाह भत्ता मंजूर केला जावा, गणवेश भत्ता हा अनेक वर्षांपासून वाढलेला नाही. आता वाढीव गणवेश भत्ता दिला जावा, परिचारिकांच्या पदनामात केंद्र शासनाप्रमाणे बदल करण्यात यावा, शैक्षणिक भत्ते देण्यात यावे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात कार्यरत परिचारिकांनी राज्य परिचारिका संघटनेच्या निर्देशावरून कामबंद आंदोलन पुकारले आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मागील तीन दिवसांपासून दररोज सकाळी परिचारिका रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने देत आहेत. २६ मेपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिका संवर्गातील सर्वच स्तरातील पदोन्नती, पदनिर्मिती व पदभरती कायमस्वरूपी करावी, केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता नव्याने मंजूर करावा, सर्व परिचारिकांना सरसकट सात हजार २०० रुपये प्रतिमाह भत्ता मंजूर केला जावा, गणवेश भत्ता हा अनेक वर्षांपासून वाढलेला नाही. आता वाढीव गणवेश भत्ता दिला जावा, परिचारिकांच्या पदनामात केंद्र शासनाप्रमाणे बदल करण्यात यावा, शैक्षणिक भत्ते देण्यात यावे. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर यांच्या निर्देशावरून शाखेच्या अध्यक्ष संगीता राठोड, सरचिटणीस सिद्धार्थ मेश्राम, कोषाध्यक्ष सुखदेव राठोड, कार्याध्यक्ष दीपाली मेश्राम, सहसचिव शकुंतला पांडे, सहकोषाध्यक्ष वैशाली दातार यांच्यासह परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

शासनाने विनंती बदल्या मान्य कराव्या- कोविड महामारीच्या काळात कोणत्याही सुट्या न घेता परिचारिकांनी सातत्याने सेवा दिली. आता त्यांच्या ३०० पेक्षा अधिक रजा असल्यास रद्द केल्या जातात. अशा रजा साठवण्याची व पुन्हा उपभोगण्याची परवानगी द्यावी, अवैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाच्या विनंती बदल्या गेल्या चार वर्षांत झालेल्या नाही. अनेक कर्मचारी कुटुंबापासून दूर राहून बाहेर जिल्ह्यात सेवा देत आहे. शासनाने त्यांच्या विनंती बदल्या मान्य कराव्या, अशी मागणी आहे. 

 

टॅग्स :agitationआंदोलन