शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आता घरबसल्या लगेच शोधा मतदार यादीतील आपले नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 17:54 IST

वोटर हेल्पलाइन अॅपवर सुविधा : टोल फ्री क्रमांकही मदतीला

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : तालुका प्रशासनाने मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधणे, मतदान केंद्र शोधणे अगदी सहज सोपे व्हावे, यासाठी वोटर हेल्पलाइन अॅप, टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. त्याचा फायदा नागरिकांना घरबसल्या करता येईल, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.

मतदारांच्या सोयीसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून, यावरून मतदार यादीतील नावाची माहिती घेता येईल. तसेच शासनाच्या संकेतस्थळावरदेखील मतदाराचा तपशील शोधता येणार आहे. वोटर हेल्पलाइन, अॅपवरदेखील ही सुविधा आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. मतदार आपले नाव ऑनलाइन प्रक्रियेद्वारे तपासू शकतात. त्यासाठी संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. या लिंकवर जाताच एका पेजवर नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, जन्मतारीख, वर्ष, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ यांच्या माहितीची नोंद करावी लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर कॅप्टा कोड टाकावा लागेल आणि यादी उघडल्यावर आपले नाव शोधावे. याच संकेतस्थळावर ईपीआयसी किंवा मतदार आयडी क्रमांकाद्वारे यादीतील नाव तपासू शकता. ईपीआयसी क्रमांक आणि राज्य निवडून, नाव मतदार यादीत आहे की नाही हे तुम्हाला कळेल. 

मतदार हेल्पलाइन अॅप वोटर हेल्पलाइन या अप्लिकेशनद्वारे नागरिकांना मतदार यादीतील आपले नाव शोधणे, मतदार नोंदणीचे अर्ज दाखल करणे, मतदान केंद्रांची माहिती आदी सुविधा उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करून घेता येते. वणी विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे मतदार म्हणून नावनोंदणी केलेली असल्यास आपले नाव असल्याची खात्री आताच करणे गरजेचे आहे. भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून तसेच मतदार हेल्पलाइन मोबाइल अॅपवरून हे तपासता येणार आहे.

"मतदारसंघातील मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असत्याची खात्री करून लोकशाही बळकटी करण्यासाठी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा. घरबसल्या नाव शोधण्यासाठी टोल फ्री किंवा वेबसाइटचा वापर करावा."- निखिल धुळधर, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४YavatmalयवतमाळVotingमतदान