शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

आता मोबाईल अ‍ॅपद्वारा वीज रिडिंग

By admin | Updated: October 9, 2016 00:10 IST

ग्राहकांकडे असलेल्या वीज मिटरचे रिडींग प्रत्येक महिन्याला वीज कंपनीकडून कॅमेराद्वारा घेतले जाते.

आॅनलाईन महावितरण : सरासरी देयके, फॉल्टी मिटरच्या तक्रारींना आळायवतमाळ : ग्राहकांकडे असलेल्या वीज मिटरचे रिडींग प्रत्येक महिन्याला वीज कंपनीकडून कॅमेराद्वारा घेतले जाते. परंतु यामध्येही मोठ्या प्रमाणात तक्रारींचे प्रमाण पाहता आता मोबाईल अ‍ॅपद्वारा हे रिडिंग घेण्यात येत आहे. यातून रिडिंगमधील चूका टळून अधिक पारदर्शकता वाढेल. ग्राहकांकडील वीज रिडिंग अचूकपणे आणि नियमित घेता यावी, यासाठी कॅमेराचा उपयोग करण्यात येत होता. परंतु तरीसुद्धा अनेक तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येत होत्या. या तक्रारींमध्ये सत्यताही आढळून आली. अनेक बिलांमध्ये तोच तो फोटो छापल्या जायचा, बहुतांश बिलातील फोटोमधील रिडिंग ओळखूच यायची नाही, रिडिंग घेणारे कर्मचारी प्रत्यक्ष घरोघरी न जाताच एकाच ठिकाणी बसून सरासरी रिडिंगचा फोटो टाकून मोकळे व्हायचे, याचा आर्थिक फटका ग्राहकांसोबतच महावितरणलाही बसायचा. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत आता, मोबाईल अ‍ॅपद्वारा रिडिंग घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये अक्षांश-रेखांश फंंक्शन असल्याने प्रत्यक्ष घरोघरी जाऊन रिडिंग घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय अ‍ॅपमध्ये इनपूटच येत नाही. यामध्ये कोणताही निष्काळजीपणा सबंधित कर्मचाऱ्याला करता येणार नाही. मोबाईल अ‍ॅप रिडिंगमुळे सरासरी देयके, फॉल्टी मिटर असे प्रकार बिलावर दाखविण्याला तिलांजली मिळणार आहे. घराला जर लॉक असेल तर अशावेळी संबंधित वीज ग्राहक मोबाईल अ‍ॅपने महावितरणशी जुळलेला असेल तर त्याला मोबाईलवर तसा मॅसेज जाईल. त्यानंतर हा ग्राहक स्वत: आपल्या मोबाईलने मीटरचा फोटो घेऊन महावितरणच्या अ‍ॅपवर रिडिंग पाठवू शकतो. त्यामुळे घराला लॉक दाखवून चुकीचे देयके आता देता येणार नाही. अमरावती विभागासह इतर काही जिल्ह्यांमध्ये या प्रक्रियेला सुरुवात झाली असून साधारणत: एक नोव्हेंबरपासून राज्यात सर्वत्र मोबाईल अ‍ॅप रिडिंगची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने विद्युत कंपनीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)अमरावती परिमंडळात अंमलबजावणीअमरावती परिमंडळात (अमरावती व यवतमाळ) सप्टेंबर २०१६ या महिन्यात परिमंडळातील विभागनिहाय मोबाईल अ‍ॅपद्वारा रिडिंग घेण्यात आलेल्या ग्राहकांची एकूण संख्या एक लाख २५ हजार ९६४ आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील वीज ग्राहक संख्या ७४ हजार ८६ तर यवतमाळ जिल्ह्यातील ग्राहकांची संख्या ५१ हजार ८७८ इतकी आहे. सप्टेंबरमध्ये मोबाईल अ‍ॅपद्वारा रिडिंग घेण्यात आलेली विभागनिहाय ग्राहकसंख्या यवतमाळ ३१, ४४१, पुसद ६४०६, पांढरकवडा १४०३१, अमरावती शहर २०९३१, अमरावती ग्रामीण ३४६०२, अचलपूर ३०५०५, मोर्शी १५०४८ अशी आहे.