शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

जमीन हस्तांतरणप्रकरणी दारव्हा एसडीओंना नोटीस

By admin | Updated: November 8, 2014 01:45 IST

माहूर येथील दत्त शिखर संस्थानच्या जमीन हस्तांतरण प्रकरणी अहवाल सादर करण्यात दारव्हा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली.

दारव्हा : माहूर येथील दत्त शिखर संस्थानच्या जमीन हस्तांतरण प्रकरणी अहवाल सादर करण्यात दारव्हा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली. त्यामुळे यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. दारव्हा तालुक्यातील महंमदपूर येथे २९४ एकर २६ गुंठे जमीन दत्तात्रय संस्थान शिखर माहूर यांच्या मालकीची आहे. ही जमीन भारत सरकारने इनाम स्वरूपात संस्थानला दिली होती. याबाबतचे पेरेपत्रक, हक्कनोंदणी दारव्हा तहसीलदाराच्या अभिलेखात १९३२-३३ पासून आहेत. परंतु या अभिलेखाची कोणतीही तपासणी न करता दिशाभूल करणारा अहवाल तहसीलदारांनी सादर केला. त्यावर आर्णी येथील गोपाल भारती यांनी आक्षेप दाखल केला. या आक्षेपावरून विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. त्यावरून उपविभागीय अधिकारी दारव्हा यांच्या अध्यक्षतेखाली १० मार्च २०१४ रोजी समिती गठीत केली. परंतु १८ महिन्यांचा दीर्घ कालावधी आणि चौकशी समिती गठीत करून चार महिन्यांचा कालावधी लोटला तरीही अहवाल सादर केला नाही. त्यामुळे भारती यांनी पुन्हा अमरावती विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत, जिल्हाधिकाऱ्यांना सूचीत केले. जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी दारव्हा यांना या प्रकरणात जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर केलेल्या कार्यवाहीचा प्रस्ताव सादर करण्याचे कळविले होते. परंतु उपविभागीय अधिकारी मनोहर कडू यांनी अहवाल सादर केला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावून तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहे. तसे न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)