ही कर्जमाफी नव्हे, तर कर्जवसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:52 IST2017-07-19T00:52:11+5:302017-07-19T00:52:11+5:30
शेतकरी कर्जाच्या विळख्यात फसला असून तो मरणाच्या दारात उभा आहे. सरकारने दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी घोषित केली.

ही कर्जमाफी नव्हे, तर कर्जवसुली
रघुनाथ पाटील : सुकाणू समितीची घाटंजी येथे पत्रपरिषद
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : शेतकरी कर्जाच्या विळख्यात फसला असून तो मरणाच्या दारात उभा आहे. सरकारने दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी घोषित केली. मात्र ही कर्ज माफी नसून कर्ज वसुली असल्याचा आरोप सुकाणू समितीचे रघुनाथदादा पाटील यांनी केला.
ते विदर्भाच्या दौऱ्यावर असताना घाटंजीत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, भारतात ४० कोटी जनता असताना अन्नधान्याचा तुटवडा होता. त्यावेळी परदेशातून अन्नधान्य आयात होत होते. शेतकऱ्यांनी १३० कोटी लोकसंख्येला पुरेल एवढे अन्नधान्य शेतकऱ्यांनी उत्पादित केले. उत्पादन वाढले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढलेच नाही. हा प्रकार सरकारच्या चुकीमुळे निर्माण झाल्याचा आरोप पाटील यांनी केला. आधी पैसे भरा नंतरच कर्जमाफी घ्या असे म्हणणे म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महेश पवार, कालिदास आपटे, हनुमंत चाटे, दिनकर दाभाडे, शिवाजीराव नंदखिले उपस्थित होते.