गोदणीच्या नीलेशची बैलजोडी अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2015 02:12 IST2015-09-13T02:12:35+5:302015-09-13T02:12:35+5:30
येथील आझाद मैदानात भरलेल्या पोळ्यातील ३१ हजार रूपयांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार गोदनी येथील नीलेश बढिये यांच्या जोडीने पटकावला.

गोदणीच्या नीलेशची बैलजोडी अव्वल
यवतमाळ : येथील आझाद मैदानात भरलेल्या पोळ्यातील ३१ हजार रूपयांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार गोदनी येथील नीलेश बढिये यांच्या जोडीने पटकावला. दुसऱ्या क्रमांकाचा २१ हजार रूपयांचा पुरस्कार सुरेश ठाकरे यांच्या जोडीने पटकावला. तिसऱ्या क्रमांकाचा ११ हजार रूपयांचा पुरस्कार रशिद मालानी यांनी पटकावला.
चौथ्या क्रमांकाचा पाच हजार रूपयांचा प्रोत्साहनपर पुरस्कार अरूण यादव, पाचव्या क्रमांकाचा प्रोत्साहनपर पुरस्कार लक्ष्मण कापसेकर यांच्या जोडीने पटकावला. यावेळी पोळा पहाण्यासाठी शहरवासीयांनी दुपारपासूनच गर्दी करणे सुरू केले होते. विविध दुकानेही नटली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुभाष राय, प्रमुख पाहुणे आमदार मदन येरावार, आरोग्य सभापती अरूणा गावंडे, मुख्याधिकारी सुदाम धोपे, नगरसेवक गजानन इंगोले, वऱ्हाडी कवी शंकर बडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. योगेश बोपचे, राजू वनकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनिल वासनिक यांनी केले. (शहर वार्ताहर)