दारव्ह्यात भरदिवसा थरार; माजी उपनगराध्यक्षांच्या मारेकऱ्याची गोळ्या झाडून हत्या

By सुरेंद्र राऊत | Updated: October 1, 2022 11:28 IST2022-09-30T13:56:21+5:302022-10-01T11:28:48+5:30

आधी बंदुकीने गोळ्या झाडल्या व त्यानंतर त्याच्यावर तलवारीने मानेवर वार करण्यात आल्याचे सांगितले जाते.

Murder of the accused in the murder of the deputy president in Darwa | दारव्ह्यात भरदिवसा थरार; माजी उपनगराध्यक्षांच्या मारेकऱ्याची गोळ्या झाडून हत्या

दारव्ह्यात भरदिवसा थरार; माजी उपनगराध्यक्षांच्या मारेकऱ्याची गोळ्या झाडून हत्या

यवतमाळ(दारव्हा) : येथील माजी उपनगराध्यक्ष सुभाष दुधे यांच्या खुनातील आरोपीचा खून करण्यात आला.ही घटना शुक्रवारला सकाळी सव्वाअकरा वाजताच्या सुमारास घडली. संदीप तोटे असे मृतकाचे नाव आहे.

तीन वर्षांपूर्वी नवराञात पंचमीच्याच दिवशी सुभाष दुधे यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात संदीप हा आरोपी आहे. सध्या जामिनावर असून तो आई व बहीणीसोबत यवतमाळ मार्गावरील कोठारी काॅम्प्लेक्स समोरुन जात असतांना त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

सुरुवातीला बंदुकीने गोळ्या झाडल्या व त्यानंतर त्याच्यावर तलवारीने मानेवर वार करण्यात आल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संदीपचा जागीच मृत्यू झाला. पोलीसांनी लगेच घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: Murder of the accused in the murder of the deputy president in Darwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.