जुन्या वादातून निर्वस्त्र करुन युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 19:17 IST2022-04-05T19:16:33+5:302022-04-05T19:17:05+5:30

Yawatmal News जुन्या वादातून एका युवकाचा निर्वस्त्र करून खून करण्याची घटना दारव्हा तालुक्यात घडली.

Murder of a youth by stripping him of an old argument | जुन्या वादातून निर्वस्त्र करुन युवकाचा खून

जुन्या वादातून निर्वस्त्र करुन युवकाचा खून

ठळक मुद्देसहा तासात चार आरोपी जेरबंद


यवतमाळः दारव्हा तालुक्यातील लोही येथे जुन्या वादातून निर्वस्त्र करून युवकाचा खून करण्यात आला. ही घटना मंगळवारला सकाळी उघडकीस आली. रमेश विश्वनाथ राऊत (३६) रा.हातोला असे मृताचे तर गणेश दिगंबर वंजारी, विश्वास श्रीकृष्ण राऊत, वैभव श्रीकृष्ण दूरीक व निलेश कटारे रा.सर्व हातोला असे आरोपींची नावे आहेत.

आपल्या भावाचा लोही गावालगत असलेल्या पांदण रस्त्याला लागून निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह पडून असल्याची फिर्याद मृतकाचा भाऊ दिनेश विश्वनाथ राऊत याने पोलिसात दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविला. निर्वस्त्र अवस्थेत पडून असलेल्या रमेशच्या चेहऱ्यावर, छातीवर, मांडीवर मुका मार असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. यावरून खुनाचा गुन्हा दाखल करून तपास चक्रे फिरवली.चार जणांना ताब्यात घेण्यात आले.

मृतक हा मद्यप्राशन करित होता. त्याचा गावातीलच युवकाशी दोन वर्षांपूर्वी वाद झाला होता. त्यातून वारंवार त्यांचे खटके उडत होते. घटनेच्या दिवशी लोही येथे मद्यप्राशन करण्यासाठी गेले असता दोघांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला. यातूनच सहकार्‍याच्या मदतीने निर्वस्त्र करून बेदम मारहाण करून खून करण्यात आला अशी हकिकत समोर आली. पोलीसांना सहा तासात आरोपींना जेरबंद करण्यात यश आले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुरेश मस्के, पीएसआय धनंजय रत्नपारखी, पीएसआय दोडके, जमादार श्रावण दाढे, सुनील राठोड, सुरेश राठोड रवी मोरलेवार यांनी केली.

Web Title: Murder of a youth by stripping him of an old argument