शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलवाडी परिसरात कुख्यात गुंडाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 05:00 IST

आरिफचा निकटवर्तीय जॅक याचा वंजारीफैल परिसरात सरकारी शाैचालयाजवळ रविवारी वाद झाला होता. त्यात आरिफने मध्यस्थी केली. यातूनच हा वाद वाढत गेला. आरिफचा काटा काढण्यासाठी तिघांनी त्याला दारू पिण्याची ऑफर दिली. व्यसनाच्या आहारी गेलेला आरिफ त्यांच्यासोबत सोमवारी दिवसभर विविध ठिकाणी बसून दारू पित होता. रात्रीसुद्धा विठ्ठलवाडी भाजी मार्केटच्या मागे मैदानात मद्यपान केल्यानंतर आरोपींनी आरिफ शाहा याचा काटा काढला.

ठळक मुद्देयवतमाळात खळबळ : तिघांना केली तत्काळ अटक, किरकोळ वाद विकोपाला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील भाजी मार्केटच्या मागील मैदानात चाकूने भोसकून   गुंड आरिफ शरीफ शाहा (रा. पिंपळगाव) याचा खून करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री १०.१५ वाजता उघडकीस आली. किरकोळ वादातून तिघांनी आरिफचा गेम केला.गाैरव पांडे (रा. वंजारीफैल), अनिकेत ऐगडवार (२२) (रा. लोहारा) व राहुल मरकुटे (२५)  (रा. वंजारीफैल) या तिघांनी आरिफचा चाकूने भोसकून खून केला, अशी तक्रार रजियाशहा शफीकशहा (४५) रा. ओमशिवम काॅलनी पिंपळगाव यांनी केली. त्यावरून खुनाचा गुन्हा शहर पोलिसांनी दाखल केला.    आरिफचा निकटवर्तीय जॅक याचा वंजारीफैल परिसरात सरकारी शाैचालयाजवळ रविवारी वाद झाला होता. त्यात आरिफने मध्यस्थी केली. यातूनच हा वाद वाढत गेला. आरिफचा काटा काढण्यासाठी तिघांनी त्याला दारू पिण्याची ऑफर दिली. व्यसनाच्या आहारी गेलेला आरिफ त्यांच्यासोबत सोमवारी दिवसभर विविध ठिकाणी बसून दारू पित होता. रात्रीसुद्धा विठ्ठलवाडी भाजी मार्केटच्या मागे मैदानात मद्यपान केल्यानंतर आरोपींनी आरिफ शाहा याचा काटा काढला. त्याला चाकूने भोसकून जागेवरच ठार केले. जागेच्या वादाचीही पार्श्वभूमी या खुनामागे आहे. आरिफवर शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. कधी काळी तो दिवटे टोळीतील सक्रिय सदस्य होता. गेल्या काही दिवसांपासून तो पिंपळगाव व वंजारीफैल परिसरात राहात होता. त्याच्या गुन्हेगारी कारवाया थंडावल्या असल्या तरी छुटपुट भांडणात तो सक्रिय होता. यातूनच त्याचा खून झाला. खुनाच्या घटनेनंतर शहर पोलिसांनी काही तासांतच आरोपींचा छडा लावला. यातील गाैरव पांडे याला शहर ठाण्यातील अंकुश फेंडर व कमलेश भोयर यांनी अटक केली, तर अनिकेत ऐगडवार याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. राहुल माळकुटे हा फरार होण्यात यशस्वी झाला. सततच्या त्रासाला कंटाळून आरिफचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. 

पुन्हा एका गुन्हेगाराचा निर्दयी अंतयवतमाळच्या गुन्हेगारी वर्तुळात कुणाचीच दहशत फार काळ टिकली नाही. येथे प्रत्येक चौकात भाई आहे. त्यामुळे प्रत्येक भाईला कुणाच्या ना कुणाच्या हातून मरण अटळ आहे. हेच आरिफ शहा याच्या खुनानंतर पुन्हा एकदा सिद्ध झाले. अगदी कमी वयातील मुलांनीच त्याचा गेम केला. 

 

टॅग्स :Policeपोलिस