ग्रामसेवकांचे आंदोलन
By Admin | Updated: October 27, 2014 22:44 IST2014-10-27T22:44:38+5:302014-10-27T22:44:38+5:30
विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. प्रत्येकवेळी खोटी आश्वासने देण्यात आली. अजूनही प्रश्न निकाली निघाली नसल्याने जिल्ह्यातील

ग्रामसेवकांचे आंदोलन
खोटी आश्वासने : जिल्हा परिषद प्रशासनावर रोष
यवतमाळ : विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. प्रत्येकवेळी खोटी आश्वासने देण्यात आली. अजूनही प्रश्न निकाली निघाली नसल्याने जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी सोमवारपासून बेमुदत असहकार आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे मानद अध्यक्ष व्ही.आर. देशमुख यांच्या अध्यक्षतेत सभा झाली. यात आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. सामान्य व पाणी फंड वगळून इतर बाबींचा अहवाल न देणे, मिटिंगला न बसणे आणि योजनेचे काम न करणे आदी स्वरूपाचे हे आंदोलन आहे. यानंतरही प्रश्न निकाली न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
सभेला संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस.के. जाधव, सचिव रमेश जारोंडे, उपाध्यक्ष संजय दुधे, कोषाध्यक्ष अजय उपलेंचवार, प्रसिद्धी प्रमुख सुभाष भोयर, उपाध्यक्ष गावंडे, तालुकाध्यक्ष हजारे, म्हातारमारे, मोघे, सुखदे, धामणकर, पतसंस्था अध्यक्ष राजेश साव, पारधी, पुलाते, फुले, हांडे आदी उपस्थित होते.
ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरावी, १२ व २४ वर्षांची कालबद्ध आणि आश्वासित योजना लागू करावी, आदर्श ग्रामसेवक पूरस्कार मिळावे, कंत्राटी ग्रामसेवकांना नियमित करावे, सेवानिवृत्त आणि दिवंगत ग्रामसेवकांना पेन्शन चालू करावी, संशयित अफरातफरीची प्रकरणे निकाली काढावी, गंभीर गुन्हा नसताना एफआयआर दाखल करू नये आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. (वार्ताहर)