शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

यवतमाळात टोळी युद्धाचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:25 IST

शहरातील जामनकर नगर, आठवडीबाजार परिसरात शनिवारी टोळी युद्धाचा भडका उडाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून अवधूतवाडी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या.

ठळक मुद्देदोन जखमी : ठाण्यात परस्परांविरुद्ध तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील जामनकर नगर, आठवडीबाजार परिसरात शनिवारी टोळी युद्धाचा भडका उडाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून अवधूतवाडी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या.कुख्यात बाबा पवार याचा भाचा विजय रमेश चव्हाण (१९) रा.जांब रोड याच्यावर विरोधी गटातील सहा जणांनी तलवार व लोखंडी रॉडने जामनकरनगर परिसरात शनिवारी दुपारी प्राणघातक हल्ला केला. विजय हा त्याचा मित्र टिकू राठोड याला भेटण्यासाठी दुचाकीने जात होता. या हल्ल्यात विजय आणि रवी जखमी झाले. त्यांनी तेथून पळ काढत अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी विजय चव्हाण याच्या तक्रारीवरून रौनक यादव (२०) रा.जामनकरनगर, मिट्टू ठाकूर (२५), आदित्य यादव (२१), विजय कैथवास (२२), सोनू ठाकूर ऊर्फ संडास (२१) तिघेही रा.आठवडीबाजार, शाहरूख पठाण रा.कळंब चौक यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तर विरोधी गटातील रौनक यादव (२०) रा. जामनकरनगर याची आई निता राजेश यादव यांच्या तक्रारीवरून रवी पवार (२०), सोनू पवार (२१) दोघेही रा.आठवडीबाजार, विक्की कापसे (२२), सचिन राठोड (२३) दोघेही रा.जामनकरनगर, विजय रमेश चव्हाण रा.जांब रोड, सागर शिंदे रा.कार्ली यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. परस्परविरोधी तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी प्राणघातक हल्ला, जबर मारहाण, धमकी देणे, दंगा घडवून आणणे व शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर यादव टोळीतील सर्व सदस्य पसार झाले. तर विजय चव्हाण हा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला असता त्याला तेथेच साथीदारासह पोलिसांनी अटक केली. या दोन्ही गटांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. पोलिसांच्या भूमिकेमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.नवोदितांचा वापरशहरात राजकीय पाठबळामुळे स्वत:ची दहशत निर्माण करण्यासाठी काही घटकांकडून नवोदितांचा वापर केला जात आहे. १८ ते २५ वयोगटातील तरूणांना हाताशी धरून त्यांची आक्रमकता स्वत:ची दहशत निर्माण करण्यासाठी वापरली जात आहे.तक्रार घेऊन आलेल्या चौघांना अटकतक्रार देण्यासाठी आलेल्या विजय रमेश चव्हाण, सचिन छगन राठोड, रवी गजानन पवार, शुभम सुधाकर कापसे या चौघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना एक दिवसाची कोठडी देण्यात आली.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस