शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आंदोलन

By admin | Updated: May 20, 2014 23:59 IST

तालुक्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांना घेवून मंगळवारी पंचायत समितीसमोर धरणे देण्यात आले. दरम्यान, पंचायत समिती प्रशासनाने प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

पुन्हा आश्वासन : घाटंजी पंचायत समिती प्रशासनाने काढली समजूत

घाटंजी : तालुक्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांना घेवून मंगळवारी पंचायत समितीसमोर धरणे देण्यात आले. दरम्यान, पंचायत समिती प्रशासनाने प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गटविकास अधिकारी चंद्रकांत बंड, कृषी अधिकारी संजय पवार, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित झालेले संजय वानखडे, विस्तार अधिकारी उडाखे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मग्रारोहयो कक्षांतर्गत येणार्‍या कामात सुसुत्रता राहावी आणि कामे जलद गतीने व्हावी यासाठी कामे विभागून दिली. ई-मस्टर संदर्भात तातडीने कामे व्हावी यासाठी सध्या तहसील कार्यालयातील डाटा एन्ट्री आॅपरेटरकडून प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाईल. नव्याने दोन डाटा एन्ट्री आॅपरेटरसाठी पाठपुरावा केला जात आहे. २०१२-१३ च्या मॅन्युअल मस्टरमध्ये अकुशल देयकाच्या अदायगीसंबंधात पंचायत समितीस्तरावर कारवाई करून पुढील कारवाईसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती आंदोलनकर्त्यांना देण्यात आली. या आंदोलनात मधुकर निस्ताने, मोरेश्वर वातीले, पांडुरंग निकोडे आदी सहभागी झाले होते. दरम्यान, ठाणेदार कुरळकर यांनी व्यक्त केलेल्या रोषावरून काही काळ वातावरण गंभीर झाले होते. ‘आंदोलन मागे घेतले म्हणून बरे झाले, नाही तर मी तुम्हा सर्वांना गजाआड डांबले असते, मंडप जमा केला असता’ असे वक्तव्य ठाणेदार कुरळकर यांनी शांततेने आंदोलन करणार्‍यांविषयी केले. हीच बाब वातावरण गंभीर होण्यास कारणीभूत ठरली. कार्यालयाची तोडफोड करणार्‍यांना चहा पाजून सन्मानाची वागणूक देणार्‍या ठाणेदाराने शांततेत आंदोलन करणार्‍यांना दिलेला ‘दम’ याविषयी येथे चांगलीच चर्चा सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)