कुमारी मातांना हक्काचे घरकूल

By Admin | Updated: August 8, 2015 02:35 IST2015-08-08T02:35:14+5:302015-08-08T02:35:14+5:30

पूर्वीच्या सर्वेक्षणातून कुमारी मातांचा जो आकडा समोर आला होता त्यावर काही स्वयंसेवी संस्थांनी आक्षेप घेतला होता.

Mother's rights to the mother's house | कुमारी मातांना हक्काचे घरकूल

कुमारी मातांना हक्काचे घरकूल

फेरसर्वेक्षण : मुकुटबनमध्ये स्वतंत्र केंद्र
यवतमाळ : पूर्वीच्या सर्वेक्षणातून कुमारी मातांचा जो आकडा समोर आला होता त्यावर काही स्वयंसेवी संस्थांनी आक्षेप घेतला होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्प कार्यालयाला विशेष बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. शुक्रवारी पांढरकवडा येथे बैठक पार पडली. कुमारी मातांचा खरा आकडा पुढे येण्यासाठी फेरसर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले. शिवाय कुमारी मातांना घरकूल देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
जिल्ह्यात झरी, मारेगाव आणि केळापूरसह वणी तालुक्यात १३८ कुमारीमाता असल्याच्या महिला बालकल्याण विभागाच्या आकड्यावर आक्षेप होता. महिला व बालकल्याण अधिकारी अर्चना इंगोले यांनी अंगणवाडी सेविका आणि युनिसेफच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या.
१०२ कुमारी मातांना पिकोफॉल मशीन वाटप केल्या जाईल. तर कुमारी मातांच्या १३ बचत गटांना पिठगिरण्या देण्यात येतील. कुमारी मातांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुकुटबनमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येईल. बैठकीला बालकल्याण अधिकारी अर्चना इंगोले यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. मरसाळे, प्रभारी प्रकल्प अधिकारी विश्वास डाखोरे, युनिसेफचे प्रतिनिधी सुनील भेले आणि दीपक पांझाडे आदींची उपस्थिती होती. (शहर वार्ताहर)

Web Title: Mother's rights to the mother's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.