शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
4
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
5
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
6
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
7
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
9
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
10
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
11
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
12
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
13
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
14
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
15
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
16
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
17
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
18
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
19
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
20
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
Daily Top 2Weekly Top 5

५० पेक्षा अधिक उमेदवार अविरोध

By admin | Updated: April 10, 2015 00:17 IST

तालुक्यातील ४० ग्रामपंचायती व २३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी ८६३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी छाननीत ४९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.

वणी : तालुक्यातील ४० ग्रामपंचायती व २३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी ८६३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी छाननीत ४९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता ८१३ उमेदवार रिंगणात कायम राहिले आहे. उद्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान तालुक्यात ५० पेक्षा अधिक उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत.निवडणूक पार पाडण्यासाठी नऊ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नऊ अधिकाऱ्यांनी बुधवारी नामांकन अर्जांची छाननी केली. छाननीनंतर विविध गावांतील १५ जागांसाठी एकही नामांकन प्राप्त न झाल्यामुळे या १५ जागा आता रिक्त राहणार आहे. पोटनिवडणुकीच्या सर्वच जागा रिक्त राहणार आहे. पोटनिवडणुकीसाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाला आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर जवळपास ५० उमेदवार अविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. त्याची घोषणा होणेच बाकी आहे. यामध्ये सावर्ला २, कवडशी ३, निलजई ३, बेलोरा २, तरोड २, पिंपळगाव २, निवली ३, बेसा ३, चिंचोली ५, शेवाळा १, सावंगी ५, परसोडा २, महाकालपूर ३, नवरगाव ३, पिंपरी १, पेटुर २, विरकुंड ३ अशा प्रकारच्या जागा अविरोध होणार आहे. दोन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील अविरोध जागांची माहिती प्राप्त होऊ शकली नाही. परंतु तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींच्या १२३ प्रभागातील ३१६ जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. यापैकी ५० पेक्षा अधिक जागा अविरोध होणार आहे. १५ जागा रिक्त राहणार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व त्यांचे प्रशिक्षण अद्याप झालेले नाही. निवडणूक यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. काही कर्मचाऱ्यांना ऐनवेळी निवडणूक कामासाठी नियुक्ती देण्यात आली. मात्र त्यांच्या पत्रात त्यांना यापूर्वीच आपणाला माहिती देण्यात आल्याचा उल्लेख आहे. (लोकमत चमू)