बोंडअळीसाठी ‘मोबाईल जनजागृती व्हॅन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 21:36 IST2018-08-06T21:36:15+5:302018-08-06T21:36:30+5:30
गुलाबी बोंडअळीच्या जाणीवजागृतीसाठी गावपातळीवर मोबाईल व्हॅनचा प्रयोग केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात यवतमाळ आणि दारव्हा तालुक्यात या व्हॅन पोहचणार आहेत. सोमवारी कृषी अधीक्षकांनी या मोबाईल व्हॅनला ेहिरवी झेंडी दाखविली.

बोंडअळीसाठी ‘मोबाईल जनजागृती व्हॅन’
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गुलाबी बोंडअळीच्या जाणीवजागृतीसाठी गावपातळीवर मोबाईल व्हॅनचा प्रयोग केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात यवतमाळ आणि दारव्हा तालुक्यात या व्हॅन पोहचणार आहेत. सोमवारी कृषी अधीक्षकांनी या मोबाईल व्हॅनला ेहिरवी झेंडी दाखविली.
पत्रकार परिषदेत या उपक्रमाची माहिती देण्यात आली. कृषी विभाग आणि किटकनाशकाच्या बायर कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ आणि दारव्हा तालुक्यातील गावांमध्ये जाणीवजागृती मोबाईल व्हॅन पोहचणार आहे. प्रत्येक गावात बोंडअळीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. फवारणी किटची माहिती दिली जाणार आहे. सायंकाळी मोठ्या गावांमध्ये सभा घेतली जाणार आहे. इतरही तालुक्यामध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. पत्रपरिषदेला कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे, कीटक शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे, बर्डे उपस्थित होते.
ट्रॅपसाठी ९० टक्के अनुदान
गुलाबी बोंडअळी नियंत्रित करण्यासाठी अनुदानावर फेरोमन ट्रॅप देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ९० आणि ७० टक्के अनुदानावर हे ट्रॅप उपलब्ध होणार आहे. आॅगस्ट ते सप्टेंबरमध्ये किडींवर नजर ठेवून निंबोळी आणि शिफारस केलेली औषधी फवारण्याचे आवाहन कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्राने केले आहे.