शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

आमदार साहेब, तुम्हीच दूषित पाणी पिऊन दाखवा; ग्रामस्थ संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 18:03 IST

Yavatmal : दूषित पाण्यामुळे गावातील अनेक जण रोगग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क :राळेगाव : तालुक्यातील कोची येथे गेल्या दीड वर्षापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. आरोग्य धोक्यात टाकून संपूर्ण ग्रामस्थच दूषित पाणी पित आहेत. काही केल्या कुणीही लक्ष देत नसल्याने नागरिक चांगलेच संतप्त झाले. राळेगाव येथे आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात ग्रामस्थ धडकले. आमदार साहेब, तुम्हीच दूषित पाणी पिऊन दाखवा, असे आव्हान करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

कोची येथील ग्रामस्थांना मिळणाऱ्या मिळणाऱ्या पाण्याने कपडे आणि भांडीसुद्धा धुणेही अशक्य आहे. हीच पाणी पिण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आमदार डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या सुरू असलेल्या जनता दरबारात धडक दिली. शंकर जवादे आणि सचिन गोफणे यांनी एका बाटलीत दूषित पाणी आणून आमदारांसमोर पिऊन दाखविली आणि आमदारांनादेखील ते पाणी पिऊन दाखविण्याची मागणी केली. आमदारांनी ते पाणी पिण्यासाठी नकार दिला. लवकरच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित करून गावात शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, त्यावर गावकऱ्यांचे समाधान झाले नाही. दूषित पाण्यामुळे गावातील अनेक जण रोगग्रस्त झाले आहेत. अनेकांना यापूर्वी पाण्यातून संसर्ग झाला होता, तरीदेखील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळू शकले नाही. 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातYavatmalयवतमाळMLAआमदार