शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या उलाढालीचे आॅडिट गुलदस्त्यात

By admin | Updated: November 11, 2014 22:47 IST

जिल्ह्याच्या विविध सहकारी संस्थांमध्ये झालेल्या सुमारे दहा हजार कोटींच्या उलाढालीचे आॅडिट गुलदस्त्यात आहे. सहकारी संस्थांना स्वत: अंकेक्षक निवडण्याची मुभा मिळाली.

यवतमाळ : जिल्ह्याच्या विविध सहकारी संस्थांमध्ये झालेल्या सुमारे दहा हजार कोटींच्या उलाढालीचे आॅडिट गुलदस्त्यात आहे. सहकारी संस्थांना स्वत: अंकेक्षक निवडण्याची मुभा मिळाली. मात्र या संस्थांनी खासगी आॅडिटर नियुक्तीचा अहवालच दिला नाही. तसेच आॅडिट फीमधील शासकीय वाटाही खासगी आॅडिटरने शासन दप्तरी गोळा केला नाही. त्यामुळे शासनाचा महसूलही बुडत आहे.सहकारी संस्थांना स्वायत्तता देण्याच्या उद्देशाने सहकार क्षेत्रात काही महत्वपूर्ण बदल सूचविण्यात आले आहे. ९७ व्या घटना दुरुस्तीत त्याचा उल्लेख करण्यात आला. यामध्ये सहकारी संस्थांनी स्वत: अंकेक्षक नेमण्याच्या बाबीचा उल्लेख करण्यात आला आहे. हा अंकेक्षक नियुक्त करण्यापूर्वी संस्थांना आमसभा घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर नियुक्त केलेल्या अंकेक्षकाची माहिती सहकार विभागाला देण्याच्या सूचना आहे. त्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला जातो. हा अंतिम अवधी दिल्यानंतरही अनेक संस्थांनी माहितीच पाठविली नाही. या कालावधीत माहिती न मिळाल्यास १० नोव्हेंबरपर्यंत जिल्हा उपनिबंधकाला आॅडिटर सूचविण्याचा अधिकार देण्यात आला होता. याच संधीचा फायदा सहकारी संस्थांनी घेतला आहे. आपल्याला हवे तसे आॅडिट ते देखील कुठल्याही हरकतीखेरीज पूर्ण करण्याचा खटाखोप सुरू झाला. सहकारी संस्थांमधील संचालकांनी केलेला खर्च, गुंतविलेली रक्कम, त्यावर आकारलेला पैसा, योग्य की अयोग्य यावर आक्षेपच दिसत नाही. खासगी आॅडिटर खर्च बिलावरही कुठलाही आक्षेप काढत नाही. अथवा संचालकांच्या खर्चाबाबत प्रश्नही विचारत नाही. त्यामुळे घटना दुरुस्तीपासून एकाही अंकेक्षकाने आक्षेप नोंदविला नाही. सहकार क्षेत्रातील घटनादुरुस्तीपूर्वी शासनाच्या तिजोरीला कृषी सलग्न पुरविणाऱ्या संस्थांच्या आॅडिटचे दीड ते दोन कोटी रुपये दहा वर्षापूर्वी मिळत होते. आता आॅडिटरची फी वाढलेली असताना महसूल मात्र शासकीय तिजोरीत जमा होत नाही. हे नेमके काय गौडबंगाल आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे. (शहर वार्ताहर)