शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

लॉकडाऊनमध्येही दारुविक्री, एसडीओंची मध्यरात्री धाड, चौघांना अटक तिघे फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 15:35 IST

चौघांना अटक : तिघे फरार, लॉकडाऊनमध्ये दारू पुरवठ्याचा प्रयत्न 

पुसद (यवतमाळ) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी असताना मध्यरात्री परवाना प्राप्त दुकानातील दारू काढण्याचा प्रयत्न येथील उपविभागीय दंडाधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी रात्री हाणून पाडला. डॉ. राठोड यांच्या नेतृत्वात पोलिसांनी धाड घातली. तेव्हा आतील चौघांना अटक करण्यात आली असून तिघे पसार होण्यात यशस्वी झाले. 

उदय जगदेवप्रसाद मिश्रा (३५) रा. ग्रीनपार्क, रहेमान खान इब्राहीम खान (५५), गढीवार्ड, फिरोज खॉ रहेमान खॉ रा. गढीवार्ड सर्व पुसद, बंडू काळूराम वारंगे (३७) रा. हिवरासंगम ता. महागाव अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. त्यांचे दुकानाबाहेर पाळतीसाठी उभे असलेले तीन साथीदार पोलिसांना पाहताच पसार होण्यात यशस्वी झाले. पुसदमधील दिग्रस रोडवर छत्रपती शिवाजी चौकात तिरुपती ट्रेडर्स हे देशी दारूचे परवानाप्राप्त दुकान आहे. लॉकडाऊन असल्याने सर्वत्र दारू विक्री बंद आहे. त्यामुळे उपलब्ध दारू दुप्पट-तिप्पट दराने विकली जाते. हीच संधी साधून मंगळवारी रात्री १ वाजताच्या सुमारास तिरुपती ट्रेडर्समध्ये काही लोक दारूचा साठा घेऊन इतरत्र पोहोचविण्यासाठी प्रयत्नरत असल्याची टीप पुसदचे एसडीओ डॉ. व्यंकट राठोड यांना मिळाली. यावरून त्यांनी पुसद शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम, वसंतनगरचे ठाणेदार प्रदीपसिंह परदेशी व एक्साईजच्या पथकाला घेऊन धाड घातली. तेव्हा आतमध्ये चार जण दारूचा साठा काढून बाहेर नेण्याच्या प्रयत्नात असल्याचे आढळून आले. त्यांना अटक करण्यात आली आहे. सुमारे दीड लाखांचा माल बाहेर काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. वृत्तलिहिस्तोवर गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती. एक्साईज विभागही या प्रकरणात स्वतंत्र कार्यवाही करणार आहे. बॉक्सपरवाना रद्दचा प्रस्तावदंडाधिकाºयांचे आदेश धुडकावून संचारबंदीत दारू विकण्याचा प्रयत्न करणाºया तिरुपती ट्रेडर्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, असा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकाºयांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती एसडीओ डॉ. व्यंकट राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळpusad-acपुसदliquor banदारूबंदीcorona virusकोरोना वायरस बातम्या