शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
8
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
9
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
10
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
11
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
12
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
13
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
14
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

जिल्ह्यातील आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 10:49 PM

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार १९ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्रमुख आमदारांची बैठक घेत आहेत. यात जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा घेतला जाणार आहे.

ठळक मुद्देविधिमंडळ : विविध विषयांचा घेणार आढावा

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार १९ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्रमुख आमदारांची बैठक घेत आहेत. यात जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा घेतला जाणार आहे.विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने दुपारी ३ वाजता ही बैठक होत आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व खाते प्रमुखांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. शासनाच्या योजना, विकास कामे, शेतकºयांचे प्रश्न, कर्जमाफी, पाणीटंचाई या प्रमुख मुद्यांवर ही बैठक होणार असल्याची माहिती आहे.शासनाच्या कर्जमाफी योजनेचा नेमका किती शेतकºयांंना लाभ मिळाला, किती बँक खात्यांमध्ये रकमा जमा झाल्या, जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीचे बळी किती, त्यांना मिळालेली मदत, बोंडअळींचे नुकसान, कापूस उत्पादक शेतकºयांना भरपाई यावर भर राहणार आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने आतापासूनच भीषण पाणीटंचाईची चिन्हे दिसू लागली आहे. यवतमाळातील पाणीटंचाईवर बेंबळाची पाईपलाईन हा सक्षम पर्याय आहे. बेंबळावरून शक्य तेवढ्या लवकरच गोधनी स्थित जलशुद्धीकेंद्रापर्यंत पाणी पोहोचविण्याचे आव्हान जीवन प्राधिकरण आणि शासनापुढे आहे. हे काम वेळेत झाल्यास यवतमाळकरांना या उन्हाळ्यात प्रचंड मोठा दिलासा मिळणार आहे. अन्यथा पिण्याच्या पाण्यावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. ग्रामीण मधील स्थितीही या पेक्षा वेगळी राहणार नसल्याचे सांगितले जाते.