शेतकऱ्यांच्या आश्वासनांची पूर्तता करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:00 AM2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:26+5:30

राज्यात प्रामुख्याने शेतकऱ्यासंदर्भात ज्या घोषणा केल्या, त्या किमान जाहीर केल्याप्रमाणे पूर्ण कराव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, दोन लाखापर्यंत जाहीर केलेली कर्जमाफी त्वरित द्यावी,

Meet the promises of farmers | शेतकऱ्यांच्या आश्वासनांची पूर्तता करा

शेतकऱ्यांच्या आश्वासनांची पूर्तता करा

Next
ठळक मुद्देभाजपची पत्रपरिषद : उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून चांगल्या लोककल्याणकारी योजनांना स्थगीती दिली आहे. हे शासन केवळ पोकळ आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करित आहे, असा आरोप भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेतून आमदारांनी केला. तत्पूर्वी विविध मागण्यांचे निवेदन एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
राज्यात प्रामुख्याने शेतकऱ्यासंदर्भात ज्या घोषणा केल्या, त्या किमान जाहीर केल्याप्रमाणे पूर्ण कराव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, दोन लाखापर्यंत जाहीर केलेली कर्जमाफी त्वरित द्यावी, अवकाळी पावसामुळे तूर, कापूस व इतर पिकांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्यात यावी, पांदण रस्त्याची कामे करण्यात यावी, नगरविकास विभाग आणि जिल्हा परिषदमध्ये बंद झालेल्या सर्व विकासाच्या योजना सुरू कराव्या, ज्या विकासकामांना सरकारने स्थगीती दिली आहे, ती त्वरित उठविण्यात यावी, उन्हाळ्याच्या दृष्टीने ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजना त्वरित सुरू करावी, अशी मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा सरचिटणीस दिनकर पावडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय पिदुरकर, सभापती संजय पिंपळशेंडे, माजी शहराध्यक्ष रवी बेलुरकर, शंकर लालसरे, अनिल पोटे, तालुकाध्यक्ष गजानन विधाते, शहराध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, ज्ञानेश्वर चिकटे, सतिश नाकले आदींनी केली.

Web Title: Meet the promises of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.