घरफोडींचा अभियंता मास्टरमार्इंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 06:00 AM2019-12-15T06:00:00+5:302019-12-15T06:00:15+5:30

या आरोपींनी घरफोडीच्या आठ गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यात नेर शहरातील २०१७ मध्ये केलेल्या घरफोडीतील ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. याशिवाय बॅटऱ्यासुद्धा जप्त केल्या. हे सर्व आरोपी अतिशय कुख्यात असून अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देत होते. यातील मास्टर मार्इंड अमजद खान याने अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.

Mastermind of thieft is an Engineer of Homes | घरफोडींचा अभियंता मास्टरमार्इंड

घरफोडींचा अभियंता मास्टरमार्इंड

Next
ठळक मुद्दे१४ लाखांचा मुद्देमाल। ११८ काडतूस, ६ पिस्टल, ७ तलवारी, १७ चाकू

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बिहार, हरियाणा या राज्यांसह विविध जिल्ह्यातील कुख्यात आरोपींना एकत्र करुन घरफोडीचे सत्र सुरू केले. या टोळीचा मास्टर मार्इंड सिव्हील इंजिनिअर असलेला युवक निघाला. त्याने पुसदमध्ये आपला अड्डा तयार करुन घातक शस्त्रांचा साठा जमा केला. पुसदमध्ये चोरट्यांनी गोळीबार केल्याची घटना झाल्यानंतर पोलिसांनी सर्वच बाजूने तपास सुरू केला. यातून ही अट्टल टोळी हाती लागली.
अमजद खान सरदार खान (२८) रा. पुसद असे या टोळीच्या मास्टर मार्इंडचे नाव आहे. देव ब्रम्हदेव राणा (२२) रा. डुबोली ठाणा कापाशेडा जि. रोहतक हरियाणा, मोहंमद सोनू मोहंमद कलाम (१९) रा. कलासन जि. मधेपुरा बिहार या दोघांना खास घरफोड्यांसाठी पुसदमध्ये आणले. यांच्यासोबतच मोहंमद आफीस मोहंमद अफजल (२७) रा. सुभाषनगर दिग्रस, सागर रमेश हसनापुरे (२२) रा. मंगरुळ दस्तगीर ता. धामणगाव जि. अमरावती, लखन देविदास राठोड रा. मोरगव्हाण ता. दारव्हा यांना सोबत घेतले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १३ डिसेंबरला पुसद शहरातील अनुप्रभा हॉटेलसमोर असलेल्या एका घरात धाड घातली. त्या ठिकाणी अमजद खान याच्यासह तिघे जण सापडले. त्यांच्याकडून सहा देशी बनावटीचे गावठी कट्टे व ११८ राऊंड मिळाले. त्यानंतर दिग्रस शहरातील शंकर टॉकीज चौक परिसरातून मोहंमद आसीफ याच्यासह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडेही एक देशी पिस्टल, तीन काडतूस, १७ धारदार चाकू, सात तलवारी असा शस्त्रसाठा मिळाला. याच टोळीसोबत काम करणाऱ्या लखन राठोड याला पुसदमध्ये अटक केली. त्याने २२ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यातील १२ मोटरसायकली यवतमाळ जिल्ह्यातील आहे. तर वाशिम व बुलडाणा येथूनही दुचाकी चोरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
या आरोपींनी घरफोडीच्या आठ गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यात नेर शहरातील २०१७ मध्ये केलेल्या घरफोडीतील ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. याशिवाय बॅटऱ्यासुद्धा जप्त केल्या. हे सर्व आरोपी अतिशय कुख्यात असून अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देत होते. यातील मास्टर मार्इंड अमजद खान याने अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्याच्या भावानेसुद्धा पॉलिटेक्नीक केले आहे. या दोघांवरही पुसदमध्ये गुन्हे दाखल आहे.
अमजदवर ३०७ चा गुन्हा आहे. तर त्याच्या भावाकडून दराटीमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. या दोघांनीही चोरट्यांची टोळी तयार केली. त्यासाठी बिहार, हरियाणा, पुसद, नांदेड, दिग्रस, नेर, दारव्हा येथील सक्रिय गुन्हेगारांना एकत्र आणले. पुसद शहराच्या मध्यवर्ती भागात भाड्याने रुम करून त्यांना ठेवले जात होते. अमजद खान याचा एकमेव व्यवसाय हा घरफोडी, चोरी, लुटपाट करणे हाच आहे. यातूनच त्याने पुसदमध्ये आलिशान घरही बनविले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंद्दमवार यांच्या पथकाने केली. त्यांच्यासोबत गोपाल वास्टर, गजानन धात्रक, गजानन डोंगरे, मुन्ना आडे, पंकज पातुरकर, उल्हास कुरकुटे, हरिश राऊत, विशाल भगत, कविश पाळेकर, मो.ताज मो. जुनेद, किशोर झेंडेकर, नागेश वास्टर, पंकज बेले, प्रवीण कुथे, दिग्रस ठाण्यातील नितीन वास्टर, अरविंद कोकाटे हे कर्मचारी होते. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरुल हसन, पुसदचे सहायक पोलीस अधीक्षक अनुराग जैन, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शन करण्यात आली.

पेट्रोल पंप व खासगी हॉस्पिटलची टोळीने केली होती रेकी
सराईर गुन्हेगारांना घेऊन अमजद खान याने अनेक गुन्हे केले आहेत. मागील काही दिवसांपासून ही टोळी पुसद शहरातील एका पेट्रोल पंपवर वॉच ठेऊन होती. त्यांनी एक-दोनदा तेथे रेकीसुद्धा केली. त्यासोबतच पुसदमधील खासगी हॉस्पिटलच्या कॅशवर या टोळीचा डोळा होता. मोठी रोकड या हॉस्पिटलमधून हलविली जाते. त्यांच्या वाहनावर ही टोळी घात लावून बसली होती. मात्र सुदैवाने तत्पूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा माग काढून त्यांना जेरबंद केले. या टोळीतील आणखी काही सदस्य फरार आहेत. त्याचा शोध सुरू आहे. टोळीकडून यवतमाळ जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांमधील गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. आठ दिवसापूर्वी या टोळीने हैदराबादमध्येही मोठा गुन्हा केल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविला जात आहे. या टोळीकडून पोलीस कोठडीत आणखी गुन्हे व मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे.

Web Title: Mastermind of thieft is an Engineer of Homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.