मार्इंदे चौकातील एटीएम फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 21:41 IST2019-01-06T21:40:45+5:302019-01-06T21:41:14+5:30
शहरातील अतिशय वर्दळीच्या अशा मार्इंदे चौकालगत असलेले अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्यात आले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सुदैवाने चोरट्यांना एटीएममधील रोकड काढता आली नाही. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आली असून त्याचा तपास सुरू आहे.

मार्इंदे चौकातील एटीएम फोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील अतिशय वर्दळीच्या अशा मार्इंदे चौकालगत असलेले अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्यात आले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सुदैवाने चोरट्यांनाएटीएममधील रोकड काढता आली नाही. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आली असून त्याचा तपास सुरू आहे.
मार्इंदे चौकालगतच्या स्टेट बँक शाखेसमोर अॅक्सीस बँकेचे एटीएम आहे. शनिवारी रात्री दरम्यान अज्ञात आरोपींनी एटीएमचे मुख्य दार व काचा फोडून मशीन उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांना यश आले नाही. एटीएम मशीनचा डिस्प्ले तेथील एसी यासह इतर साहित्याचीही अज्ञात आरोपींनी तोडफोड केली. या प्रकरणी अॅक्सीस बँकेचे संदेश महादेवराव देशमुख यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून अवधूतवाडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसापूर्वी जांब रोड येथे एकाच परिसरातून घरात ठेवलेले मोबाईल चोरीला गेले. यासह अनेक छोट्या-मोठ्या चोऱ्या सातत्याने होत आहे. या प्रकरणांचा छडा लावण्याचे आव्हान स्थानिक पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.