Maratha Reservation : जातीच्या पहिल्या ऑनलाईन दाखल्याचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 19:01 IST2018-12-12T18:59:52+5:302018-12-12T19:01:23+5:30
सरकारने मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर मराठा तरुणांना उत्सुकता होती ती जातीच्या प्रमाणपत्राची.

Maratha Reservation : जातीच्या पहिल्या ऑनलाईन दाखल्याचे वाटप
- अविनाश खंदारे
उमरखेड : आज उमरखेड येथे विदर्भातून पहिला मराठा जातीचा दाखला स्वप्नील कनवाळे याला देण्यात आला.
सरकारने मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर मराठा तरुणांना उत्सुकता होती ती जातीच्या प्रमाणपत्राची. आता ते पण सुरू झाले असून मराठा जातीचे प्रथम प्रमाणपत्र उमरखेड उपविभागीय कार्यालय मार्फत आज स्वप्नील कनवाळे यांना देण्यात आले. सरकार मार्फत येत्या काही दिवसात घेण्यात येणाऱ्या मेगाभरतीमध्ये मराठा तरुणांना याचा निश्चित फायदा होणार आहे. सदर मराठा जातीचा दाखला उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, सुधीर देशमुख (नायब तहसीलदार), शिवाजी माने, सचिन घाडगे, प्रविण सूर्यवंशी, प्रविण कलान, विकास डोळस, भागाजी शिवरतवाड, अमोल भालेराव, भागवत माने हजर होते.
येत्या काही दिवसात सरकार मार्फत होणाऱ्या मेगाभरतीमध्ये मराठा तरुणांना लाभ घेण्यासाठी तरुण तरुणींनी हे प्रमाणपत्र आपल्या जवळच्या उपविभागीय कार्यालयात काढून घेण्याचे आवाहन या वेळी उपविभागिय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.