शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

शिक्षक भरतीत मराठा समाजाला डावलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 06:35 IST

मोठा गाजावाजा करत सरकारने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली असली, तरी १७ जिल्हा परिषदांमध्ये सामाजिक आणि अर्थिक मागास प्रवर्गातील (एसईबीसी) मराठा समाजासाठी एकही जागा राखीव ठेवण्यात आलेली नाही

- अविनाश साबापुरे यवतमाळ : मोठा गाजावाजा करत सरकारने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली असली, तरी १७ जिल्हा परिषदांमध्ये सामाजिक आणि अर्थिक मागास प्रवर्गातील (एसईबीसी) मराठा समाजासाठी एकही जागा राखीव ठेवण्यात आलेली नाहीसामाजिक आणि अर्थिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) म्हणून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. आरक्षणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यातही शाळा व्यवस्थापनांनी पवित्र पोर्टलवर अपलोड केलेले ‘रोस्टर’ सुधारित करण्याचे आदेश देण्यात आले. एसईबीसीच्या जागा लक्षात घेऊन नवीन रोस्टर मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेण्यात आले, त्यानुसारच राज्यातील रिक्त पदांची आकडेवारी जाहीर करण्यात आली.शिक्षक भरतीत एसईबीसीच्या ११५४ जागा भरल्या जातील, असे सरकारकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात जिल्हा परिषदांच्या जाहिराती पोर्टलवर आल्यानंतर मराठा उमेदवारांची घोर निराशा झाली. यातील १७ जिल्हा परिषदांच्या रोस्टरमध्ये एसईबीसी प्रवर्गासाठी शून्य जागा राखीव आहेत. अकोला, अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, हिंगोली, धुळे, गडचिरोली, जालना, नांदेड, कोल्हापूर, नाशिक, सातारा, सोलापूर, वाशिम, यवतमाळ, जालना या जिल्हा परिषदांनी मराठा उमेदवारांना शिक्षकाची एकही जागा ठेवलेली नाही.३४ पैकी सोमवारपर्यंत २९ जिल्हा परिषदांच्या जाहिराती पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. त्यापैकी तर १२ जिल्हा परिषदा मिळून केवळ ४१६ जागा या उमेदवारांसाठी दिसत आहेत. यात भंडारा २०, बुलडाणा २२, गोंदिया ९, जळगाव ४८, नंदूरबार ३, परभणी ७०, रत्नागिरी ७२, सांगली ३८, सिंधुदुर्ग २७, रायगड १०२, पुणे ४, पालघर १ अशा जागा आहेत.> नियुक्ती नाकारण्याच्या आदेशाने संतापमराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू असले, तरी या विरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे याचिकांवरील निर्णय येईपर्यंत एसईबीसी आरक्षणातून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देऊ नये, असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. आधीच जागा कमी, त्यातही नियुक्ती नाकारणारा आदेश शासनाने दिल्यामुळे उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.>प्रत्येक जाहिरातीत एसईबीसी प्रवर्गाचा उल्लेख आहे. जिल्हानिहाय रोस्टरचा विचार करून एकूण १,३०० पदे या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.-विनोद तावडे, शिक्षणमंत्री

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण