मेडिकलचे ओबीसी आरक्षण कायम ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 21:45 IST2018-07-03T21:44:44+5:302018-07-03T21:45:51+5:30
मेडिकल प्रवेश प्रक्रियेत ओबीसींना २७ टक्के आरक्षण असतानाही, केंद्राने ते केवळ २ टक्के केले आहे. या विरोधात मराठा सेवा संघाने सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत आरक्षण कायम ठेवण्याची मागणी केली.

मेडिकलचे ओबीसी आरक्षण कायम ठेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मेडिकल प्रवेश प्रक्रियेत ओबीसींना २७ टक्के आरक्षण असतानाही, केंद्राने ते केवळ २ टक्के केले आहे. या विरोधात मराठा सेवा संघाने सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत आरक्षण कायम ठेवण्याची मागणी केली.
भारतीय राज्यघटनेप्रमाणे ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. असे असतानाही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशातील ओबीसींचे आरक्षण २ टक्के करण्यात आले. हा प्रकार ओबीसींवर अन्याय करणारा आहे. या घटनेच्या विरोधात मराठा सेवा संघाने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. ओबीसींना नियमाप्रमाणे २७ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. यानंतरही यावर्षीपासून ओबीसींना एमबीबीएसच्या प्रवेशामध्ये फक्त २ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. यामुळे अनेकांना प्रवेशास मुकावे लागले आहे. या घटनेच्या विरोधात आवाज उठवित मराठा सेवा संघाने सोमवारी निवेदन सादर केले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रवीण भोयर, प्रद्युम्न जवळेकर, सुनिल कडू, सुरज खोब्रागडे, सचिन येवले आदी उपस्थित होते.
छिंदम, भिडे समर्थकांवर कारवाई करा
अहमदनगरमधील भाजपाचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या प्रकरणात आवाज उठविणारे अॅड. गजेंद्र दांगट यांच्यावर छिंदम समर्थक आणि भिडे समर्थक यांनी हल्ला केला. यामुळे अॅड. दांगट यांना सुरक्षा देऊन संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठा सेवा संघाने केली.