शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महिलांच्या घरात केले घर

By admin | Updated: October 11, 2014 02:17 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा उमेदवार राजू उंबरकर यांच्या झंझावती प्रचार दौऱ्याने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे.

वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा उमेदवार राजू उंबरकर यांच्या झंझावती प्रचार दौऱ्याने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे. उंबरकर ज्या गावात जातात, तेथे महिलांकडून ओवाळणी होत असल्याने त्यांच्यासह कार्यकर्तेही भारावून गेले आहेत.विधानसभा निवडणुकीत आता प्रचाराने वेग घेतला आहे. सर्वच उमेदवार परिसर पिंजून काढत आहेत. यात मनसेने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली. त्यानंतर पक्षाचे संस्थापक राज ठाकरे यांची वणीत जाहीर सभा झाली. या सभेनंतर मनसेचे कार्यकर्ते एकदम ‘चार्ज‘ झाले आहेत. राज ठाकरे यांच्या सभेनंतर हळूहळू राजकीय वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा जोमाने प्रचारात गुंतले आहेत. सध्या राजू उंबरकर ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून आहे. दररोज पहाटेच ते एखाद्या गावात पोहोचतात. ते गावात आल्याची माहिती कळताच क्षणार्धात महिला पुढे सरसावतात. उंबरकर यांना ओवाळण्यासाठी त्यांची चढाओढ सुरू असते. प्रत्येक गावात माता-भगिनींकडून अत्यंत जिव्हाळ्याने ओवाळणी होत असल्याने उंबरकरही स्तब्ध झाले आहे. त्यांना कल्पना नसतानाही गावांमध्ये त्यांची ओवाळणी होत आहे. वणीसह मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील गावांमध्येही त्यांची ओवाळणी सुरू आहे. त्यामुळे महिलांचा त्यांना मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे स्पष्ट होत आहे. गेली पाच वर्षे उंबरकर यांनी सामान्य जनता, महिला, भगिनींसाठी केलेले कार्य, आता कुठे दिसून येत आहे. त्याचमुळे गावोगावी त्यांची ओवाळणी सुरू आहे. या भारावलेल्या वातावरणाने निवडणुकीपेक्षाही मिळालेले प्रेम बघून उंबरकर स्वत: आश्चर्यचकित होत आहे. कोणतीही निवडणूक येईल आणि जाईल, मात्र महिला, भगिनींच्या जिव्हाळ्याला आपण तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही ते जागोजागी देत आहेत. विधानसभा निवडणुकीपेक्षाही त्यांना प्रत्येक गावात मिळणाऱ्या जिव्हाळ्याचे ‘मोल‘ अधिक महत्वाचे वाटत आहे. निवडणुकीतील जय आणि पराजय, यांच्यापेक्षाही माता-भगिनींचे हे प्रेम सदैव असेच कायम राहावे, अशा भावना ते व्यक्त करीत आहे. या प्रेमाने भारावून गेलेले राजू उंबरकर खऱ्या अर्थाने इतर उमेदवारांपेक्षा वेगळे दिसून येत आहे. त्यामुळेच त्यांनी आता जय आणि पराजयाची, पर्वा न करता केवळ जनतेच्या समस्यांसाठी कायम लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ओवाळणीसह गावोगावी त्यांना भेटण्यासाठी ग्रामस्थ वाट बघत असल्याने उंबरकर प्रचंड भारावून गेले आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)