शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
2
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
3
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
4
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
5
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
6
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
7
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
8
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
9
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
10
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
11
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
12
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
13
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
14
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
15
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
16
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
17
हार्दिक पांड्याने खरंच माहिका शर्मासोबत साखरपुडा केला? पूजाविधी करणारे पंडितजी म्हणाले...
18
आलिशान कार, गर्लफ्रेंड, चोरी, नाकाबंदी... नर्सिंगची विद्यार्थिनी बनली बॉयफ्रेंडची क्राइम पार्टनर
19
Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
20
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : मोदी जिथे जातात तिथे खोटे बोलून येतात, राहुल गांधींची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 16:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटे बोलतात. ते जिथे जातात तिथे खोटे बोलून येतात, अशी बोचरी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यवतमाळमधील वणी येथे  केली.

(वणी) यवतमाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटे बोलतात. ते जिथे जातात तिथे खोटे बोलून येतात, अशी बोचरी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यवतमाळमधील वणी येथे  केली. तसेच भाजपाने आश्वासन दिल्याप्रमाणे सर्वसामान्यांना ना 15 लाख रुपये मिळाले, ना 6 हजार रुपये मिळाले, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला.  राहुल गांधी यांनी देशातील आर्थिक परिस्थितीवरून नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघात केला. ''लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, प्रत्येकाच्या खात्यात  6 हजार रुपये जमा केले जातील. त्याआधी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्यात येतील, असेही आश्वासन दिले होते. मात्र मिळालं काय? मोदी जिथे कुठे जातात तिथे खोटं बोलतात.''असा घाणाघात राहुल गांधींनी केला. परदेशातील काळा पैसा परत आणू. तिथे एवढा काळा पैसा आहे की प्रत्येक देशवासीयाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करता येतील, असे 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने सांगितले होते. भाजपाच्या याच आश्वासनावरून काँग्रेसने भाजपाला वारंवार घेरले आहे. दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात प्रतिवर्षी 6 हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. भाजपाच्या याच घोषणांवरून राहुल गांधी यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. तसेच मोदींवर खोटारडेपणाचा आरोप केला आहे. ''नरेंद्र मोदी हे प्रचारावेळी जनतेचे लक्ष्य मूळ मुद्यांवरून भरकटवण्याचे काम करतात. ते कधी चंद्राची गोष्ट सांगतात. कधी 370 वर बोलतात. कधी कॉर्बेट पार्कमध्ये पिक्चर बनवतात. पण जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर मोदी एक शब्दही बोलत नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाyavatmal-acयवतमाळ