शहरं
Join us  
Trending Stories
1
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
2
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
3
डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक 'दादागिरी'? उदय कोटक यांनी २०२४ मध्येच केली होती भविष्यवाणी
4
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
5
० ० ० ० ० ० ... ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा... महाराष्ट्राचा 'जादूगार' रामकृष्णने जिंकवली मॅच
6
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
7
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
8
भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा; मैदानावरच फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
10
अपघातग्रस्ताला 1.5 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
11
Share Market Down: शेअर बाजारात ५०० अंकांपेक्षा अधिक घसरण, निफ्टीबी २५,८०० च्या खाली; 'ही' आहेत ५ कारणं
12
अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होऊ शकते वाढ; काय म्हटलंय नव्या रिपोर्टमध्ये
13
Ritual: सावधान! तुम्हीही मंदिरात मूर्तीच्या मागच्या बाजूला डोकं टेकवता का? आधी 'हे' वाचा
14
काळाचा घाला! MBBS विद्यार्थ्यासोबत आक्रित घडलं, नेपाळमध्ये मृत्यूने गाठलं; १० मार्चला होतं लग्न
15
२० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे ५५ रुपये लावले; ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाला शिकवला धडा
16
एक दिवसाच्या दूध-ब्रेडपेक्षाही स्वस्त आहे 'या' देशात सोनं; एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात अवघे इतके रुपये!
17
"शशांकने एवढा तमाशा करायला नको होता...", मंदार देवस्थळींच्या वादात अभिनेत्रीच्या नवऱ्याची उडी, म्हणाला- "माझ्या बायकोचेही ३.५० लाख..."
18
Nashik Municipal Election 2026 : कुंभ पर्वातील वचनात शाश्वत विकासाची ग्वाही; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
19
WPL 2026 Opening Ceremony : हरमनप्रीत अन् स्मृती मैदानात उतरण्याआधी या बॉलिवूडकरांचा दिसणार जलवा
20
'लाडक्या बहिणीं'साठी स्टार प्रचारकही मैदानात, महिला मतांचा कौल ठरणार निर्णायक
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : आघाडी सरकारचा पैसा दलालांच्या खिशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

आर्णी येथील डुबेवार ले-आऊटमध्ये पहिली विजय संकल्प सभा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधक या निवडणुकीत लोकसभेचीच कॅसेट वाजवित असल्याचा आरोप केला. राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांना ११०० कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचे सांगितले. बळीराजा संजीवनी योजना, घर तेथे शौचालय, उज्ज्वला योजना आदी राबविल्याचे स्पष्ट केले. राज्यात ३० हजार किलोमीटरचे नवीन रस्ते तयार केल्याचे सांगितले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा आरोप : आर्णी, दिग्रस, पुसद येथे सभा, महायुती सरकारचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी/दिग्रस/पुसद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी आर्णी, दिग्रस आणि पुसद येथे झालेल्या जाहीर सभेत पूर्वीच्या आघाडी सरकारचा पैसा दलालांच्या खिशात गेल्याचा आरोप केला. मात्र महायुतीच्या सरकारचा पैसा शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा झाल्याचा दावा केला. त्यांनी गेल्या पाच वर्षातील विकास कामांचा पाढा वाचला. संपूर्ण राज्यात कुठेही चुरस नसून लढण्यापूर्वीच विरोधी पक्ष नेते दुसºया देशात पळून जातात, असा घाणाघात त्यांनी केला.आर्णी येथील डुबेवार ले-आऊटमध्ये पहिली विजय संकल्प सभा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधक या निवडणुकीत लोकसभेचीच कॅसेट वाजवित असल्याचा आरोप केला. राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांना ११०० कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचे सांगितले. बळीराजा संजीवनी योजना, घर तेथे शौचालय, उज्ज्वला योजना आदी राबविल्याचे स्पष्ट केले. राज्यात ३० हजार किलोमीटरचे नवीन रस्ते तयार केल्याचे सांगितले. जनतेने गरिबीमुक्त करणाºया या सरकारला पुन्हा निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.आर्णीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर होते. मंचावर प्राचार्य डॉ.अशोक उईके, डॉ.संदीप धुर्वे, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, किशोर तिवारी, आर्णीच्या नगराध्यक्ष अर्चना मंगाम, पांढरकवडा नगराध्यक्ष वैशाली नहाते, एन.टी. जाधव, संतोष बोरेले, श्रीराम मेल्केवार, शेखर लोळगे, विपीन राठोड, विशाल देशमुख आदी उपस्थित होते. आभार विजय कोटेचा यांनी मानले.पांढरकवडा नगराध्यक्षांसह १४ नगरसेवक भाजपमध्येआर्णीच्या सभेत पांढरकवडा येथील प्रहारच्या नगराध्यक्ष वैशाली नहाते यांच्यासह सलीम खेतानी, शाहीद शरीफ आदी १४ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच बाजार समितीच्या तीन संचालकांनीही प्रवेश केला.पुसदमध्ये परिवर्तन घडवा, मंत्रिपद मिळवापुसद : येथील सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुसद मतदारसंघात परिवर्तन घडवा आणि मंत्रिपद मिळवा, असे खुले आवाहन केले. तसेच आघाडीच्या नेत्यांनी १५ वर्षांचा हिशेब द्यावा. मी पाच वर्षांचा देतो, असे आवाहन दिले. सोबतच येत्या २०२१ पर्यंत राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, याची ग्वाही दिली. मंचावर आमदार अ‍ॅड.नीलय नाईक, विजय पाटील चोंढीकर, राजन मुखरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, राजेंद्र डांगे, विनोद जिल्लेवार, अ‍ॅड.उमाकांत पापीनवार, विश्वास भवरे, बाबासाहेब वाठोरे, डॉ.सुजाता नाईक, शंकर नाईक आदी उपस्थित होते.दिग्रसच्या गद्दारांना इव्हीएमच्या टकमक टोकावरून ढकलादिग्रस : छत्रपती शिवाजी महाराज यांची परंपरा जोपासणारा पक्ष म्हणून शिवसेना आणि भाजप महायुतीची ओळख आहे. मात्र काही गद्दार धोका निर्माण करीत आहे. अशांना ईव्हीएमच्या टकमक टोकावरून असे ढकला की ते पुन्हा उठून उभेसुद्धा राहता कामा नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी दिग्रस येथील सभेत केले. त्यांचा सर्व रोख भाजपचे बंडखोर संजय देशमुख यांच्यावर होता. यावेळी मंचावर महसूल राज्यमंत्री संजय राठोड, प्रा.अजय दुबे, नगराध्यक्ष सदफजहाँ मो. जावेद उपस्थित होते.

टॅग्स :pusad-acपुसद