शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

महागाव तहसीलचा लिपिक निलंबित

By admin | Updated: May 27, 2015 02:13 IST

जिल्ह्याच्या प्रशासनातील कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्याचा इशारा नवनियुक्त जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग यांनी दिला होता.

यवतमाळ : जिल्ह्याच्या प्रशासनातील कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्याचा इशारा नवनियुक्त जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग यांनी दिला होता. याची सुरूवात त्यांनी महागाव तहसील कार्यालयापासून केली. महागाव तहसीलच्या लिपिकाने सहा महिन्यांपासून कॅशबुकच भरले नव्हते. त्यामुळे या लिपिकाला थेट निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. महागाव तहसीलमध्ये लिपिक सी.के. कळणे यांच्या दफ्तर दिरंगाईमुळे त्रस्त झालेल्या प्रभारी तहसीलदारांनी कळणे याच्या बदलीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांपुढे ठेवला. जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग यांनी त्या प्रस्तावातील कारणांचे अवलोकन केले असता कॅशबुक सहा महिन्यांपर्यंत न भरण्याचा प्रकार समोर आला. या गंभीर प्रकारासाठी बदली हा पर्याय ठरु शकत नाही, असे ठणकावत थेट त्या लिपिकाच्या निलंबनाचा आदेश काढा असे निर्देश अधिनस्थ यंत्रणेला दिले. त्यानुसार प्रभारी तहसीलदारांकडून निलंबनाचा प्रस्ताव देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने त्यावर स्वाक्षरी करून सी.के. कळणे यांचे निलंबन केले. जबाबदारीपासून दूर पळणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची हयगय केली जाणार नाही असे जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्याच बैठकीत आपल्या सहकाऱ्यांना बजावले होते. (कार्यालय प्रतिनिधी)सुटीवर जाण्यापूर्वी द्यावा लागेल प्रभारजिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कर्मचारी सुटीवर जाण्यापूर्वी आपला प्रभार विभाग प्रमुखाकडे सुपूर्द करत नाही. त्यामुळे बरेचदा तातडीच्या बैठकांमध्ये माहिती उपलब्ध होत नाही. विभागप्रमुखाकडून कर्मचारी सुटीवर असल्याची सबब पुढे केली जाते. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र आदेश काढले असून, कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी रजेवर जाण्यापूर्वी आपल्याकडे असलेल्या कपाटाची किल्ली कार्यालयात जमा करावी असे निर्देश दिले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांकडून या आदेशाची अंमलबजावणी होणार नाही, त्यासाठी त्यांच्या विभागप्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल अशीही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. आता कार्यालयाच्या किल्ल्या घेऊन गैरहजर राहणे कर्मचाऱ्यांना महाग पडणार आहे.