शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

कमी दाबाची वीज उठली शेतकऱ्यांच्या जीवावर

By admin | Updated: October 12, 2014 23:38 IST

अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे मेटाकुटीस आलेला बळीराजा विविध उपाय करत सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विद्युत कंपनीच्या धोरणाचा फटका त्यांना अजूनही सहन करावा लागत आहे

पांडुरंग भोयर ल्ल सोनखासअस्मानी आणि सुलतानी संकटामुळे मेटाकुटीस आलेला बळीराजा विविध उपाय करत सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विद्युत कंपनीच्या धोरणाचा फटका त्यांना अजूनही सहन करावा लागत आहे. सध्या खरिपाच्या पिकाला पाण्याची गरज आहे. मात्र कमी दाबाची वीज असल्याने मोटरपंप सुरू होत नाही तर काही ठिकाणच्या मोटारी जळल्या आहेत. एकूणच हा प्रकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मात्र केबीनमध्ये बसून कारभार चालवित असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये भर पडत आहे.उशिराचा पाऊस, दुबार-तिबार पेरणी आदी कारणांमुळे परिसरातील शेतकरी हैराण झाला आहे. पुढे झालेल्या पावसामुळे कपाशी, सोयाबीन आदी पिके कशीबशी जगली. आता तीव्र उन्हामुळे जमिनी कडक आल्या आहेत. त्यामुळे पिके सुकू लागली आहे. अशा स्थितीत या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, ते आटापिटा करून ही पिके जगविण्याचा प्रयत्न करत असतानाच कमी दाबाची वीज या प्रयत्नात आड येत आहे.परिसरात अतिशय कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे मोटरपंप सुरूच होत नाही, झाल्या तरी जळतात. या परिसराला मालखेड(खु) फिडरवरून वीज पुरवठा होतो. उत्तरवाढोणा, सोनवाढोणा, सोनखास, हेटी आदी भागांना या कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा तडाखा बसत आहे. थ्री फेजवर चालणारी उपकरणे पूर्णत: निकामी होत असून जनतेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. मोटरपंप जळत असल्याने शेतकरी आपल्या पिकाला पाणी देवू शकत नाही. त्यामुळे पिके वाळण्याची भीती आहे. आर्थिक अडचणींमुळे जळालेल्या मोटारी दुरुस्त करण्याची सोयही अनेकांकडे नाही. त्यामुळे डोळ्यासमोर वाळणाऱ्या पिकांकडे पाहून शेतकऱ्यांच्या हृदयात धस्स होत आहे. विद्युत कंपनीचे अधिकारी मात्र यावर कुठलाही उपाय शोधण्यास तयार नसल्याने नागरिकांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे. या संतापाचा उद्रेक केव्हाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.