लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २२ व्या स्मृती दिनानिमित्त २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात रविवारी सकाळी दर्डा मातोश्री सभागृहात ‘लोकमत सरपंच अवॉर्ड - २०१९’ वितरण सोहळा थाटात पार पडणार आहे. तर सायंकाळी ‘प्रेरणास्थळा’वर नामवंत कलावंतांची स्वरांजली मैफल होणार आहे.नियोजनबद्ध कामातून गावाचा विकास करणाऱ्या सरपंचांना गौरविण्यात येणार आहे. ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ वितरण सोहळा सकाळी ११.३० वाजता पार पडणार आहे. यासाठी नोंदणी सकाळी १०.३० ते ११.३० पर्यंत केली जाणार आहे.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे व अन्य मान्यवरांची यावेळी अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.सायंकाळी पंडित विश्व मोहन भट्ट यांची मैफलरविवारी सायंकाळी ६.३० वाजता प्रेरणास्थळ येथे पद्मभूषण तथा ग्रॅमी अवॉर्ड विजेते पंडित विश्वमोहन भट्ट हे ‘मोहन वीणा’ या अनोख्या वाद्यासह रसिकांना रिझविणार आहे. या मैफलीत पंडित भट्ट यांच्यासह राजस्थानी गायकांची जुगलबंदीही रंगणार आहे. यात उस्ताद अनवर खान मंगणियार, राजस्थानी लोकगीतांसह सुफी रचना पेश करणार आहे. तसेच पंडित सलिल भट, हिमांशू महंत, कुटले खान यांचाही समावेश राहणार आहे. वाद्य-स्वरांची अनोखी मेजवाणी रसिकांना मिळणार आहे.
लोकमत सरपंच अवॉर्डचे आज थाटात वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST
नियोजनबद्ध कामातून गावाचा विकास करणाऱ्या सरपंचांना गौरविण्यात येणार आहे. ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ वितरण सोहळा सकाळी ११.३० वाजता पार पडणार आहे. यासाठी नोंदणी सकाळी १०.३० ते ११.३० पर्यंत केली जाणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा राहणार आहेत.
लोकमत सरपंच अवॉर्डचे आज थाटात वितरण
ठळक मुद्देजवाहरलाल दर्डा स्मृती समारोह।