महागाव नगरपंचायतीला नगरसेवकांनी ठोकले कुलूप

By Admin | Updated: May 8, 2016 02:08 IST2016-05-08T02:08:33+5:302016-05-08T02:08:33+5:30

११ वाजले तरी नगरपंचायत कार्यालयात कर्मचाऱ्यांचा पत्ता नव्हता. त्यामुळे नागरिक ताटकळत असल्याचे पाहून काँग्रेसचे नगरसेवक संतप्त झाले.

Locked by the corporators of Mahagaon Nagar Panchayat | महागाव नगरपंचायतीला नगरसेवकांनी ठोकले कुलूप

महागाव नगरपंचायतीला नगरसेवकांनी ठोकले कुलूप

महागाव : ११ वाजले तरी नगरपंचायत कार्यालयात कर्मचाऱ्यांचा पत्ता नव्हता. त्यामुळे नागरिक ताटकळत असल्याचे पाहून काँग्रेसचे नगरसेवक संतप्त झाले. त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकून प्रभारी सीओ प्रवीण मानकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष आरिफ सुरैया यांच्या नेतृत्वात नगरसेवक व काँग्रेसचे गटनेते शैलेश सुरोसे, परवेश सुरैया, सुनील भरवाडे यांनी नगपंचायतीला कुलूप ठोकले. ही माहिती सुरोसे यांनी सर्वांना दिली. गावातील नागरिकांसह नगराध्यक्ष सुनील नरवाडे, उपनगराध्यक्ष उदय नरवाडे, अजय कदम, रामराव पाटील नरवाडे तातडीने दाखल झाले. पाणीपुरवठ्याचे काम सुरू असून त्या ठिकाणी कर्मचारी पाठविल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली. ११ वाजले तरी कार्यालय बंद असल्याचे पाहून काँग्रेसचे नगरसेवक भडकले होते. नागरिकांची कामे खोळंबली असून कारभार प्रभारावर सुरू असल्याची नाराजी व्यक्त केली. प्रभारी सीओ मानकर यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कुलूप उघडण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Locked by the corporators of Mahagaon Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.