लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांचे अरूणाचलमध्ये निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2022 22:58 IST2022-10-04T22:50:39+5:302022-10-04T22:58:46+5:30

चीनच्या सीमेवर ड्युटी बजावत असताना त्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.

lieutenant colonel Vasudev Awari passed away in Himachal | लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांचे अरूणाचलमध्ये निधन

लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांचे अरूणाचलमध्ये निधन

- संतोष कुंडकर

वणी (यवतमाळ): तालुक्यातील मुर्धोनी येथील रहिवासी व सध्या आर्मीत कार्यरत लेफ्टनंट कर्नल वासुदेव दामोधर आवारी(३५) यांचे अरूणाचल प्रदेशात ड्युटीवर तैनात असताना हृदयविकाराने निधन झाले. ते चीनच्या सीमेवर ड्युटी बजावत असताना त्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांना लगेच मिल्ट्रीच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे. उद्या बुधवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव वणी येथे आणण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांतर्फे देण्यात आली.

Web Title: lieutenant colonel Vasudev Awari passed away in Himachal