शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या देणगीतून विद्यार्थ्यांसाठी पुस्तकालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 22:14 IST

कुणाला डॉक्टर व्हायचंय, तर कुणाला इंजिनिअर. पण, अभ्यासासाठी पुस्तके नाही. गरजू विद्यार्थ्यांची ही गरज शिक्षकांनी पूर्ण केली. देणगी उभी करून विद्यार्थ्यांसाठी जेईई, स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या विषयांचे पुस्तकालयच सुरू केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कुणाला डॉक्टर व्हायचंय, तर कुणाला इंजिनिअर. पण, अभ्यासासाठी पुस्तके नाही. गरजू विद्यार्थ्यांची ही गरज शिक्षकांनी पूर्ण केली. देणगी उभी करून विद्यार्थ्यांसाठी जेईई, स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या विषयांचे पुस्तकालयच सुरू केले. नेर येथील दि इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या गुरूजींनी सुरू करून दिलेल्या या पुस्तकालयामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच बसून स्पर्धा परीक्षेची तयारी करता येणार आहे.या पुस्तकपेढीचे उद्घाटन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजीव ठाकरे यांच्या हस्ते झाले. संस्थेचे अध्यक्ष वसंत पोहेकर, उपाध्यक्ष डॉ. बी.सी. लाड, सचिव विष्णूपंत गुल्हाने, सहसचिव मधुकर बोबडे, संचालक डॉ. मोहन शर्मा, डॉ. राजाभाऊ चोपडे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. प्राचार्य उदय कानतोडे यांनी मार्गदर्शन केले.शिक्षकांनी उभी केलेली ही ग्रंथपेढी समृद्ध करण्यासाठीचाही संकल्प केला. प्रत्येकाने यासाठी योगदानाची तयारी दर्शविली आहे. पुढील काळात हे पुस्तकालय विविध स्पर्धात्मक परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांनी खचाखच भरलेले दिसणार आहे. विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी होण्याचे स्वप्न या पुस्तकालयाच्या माध्यमातून साकारले जावे, अशी अपेक्षा सर्वांना आहे. पुस्तकपेढीसाठी उपप्राचार्य के.पी. देशमुख, पर्यवेक्षक मनोज जिरापुरे, प्रा. किशोर राठोड, प्रा. चिंचोळकर, प्रा. प्रशांत बुंदे, प्रा. उज्ज्वला राऊळकर, प्रा. मनीषा बन्सोड, प्रा. सुनील गावंडे, प्रा. अरुण नरवडे, प्रा. प्रवीण मिसाळ यांचेही योगदान महत्त्वपूर्ण राहिले.

टॅग्स :Teacherशिक्षक