शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

लंपी आजारामुळे डवरणीचे काम खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST

लंपी हा जनावरांना होणारा त्वचा रोग आहे. हा आजार संसर्गाने फैलावत असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनावरे आजारी पडत आहे. उपचाराने हा आजार पूर्णत: बरा होत असला तरी एकदा आजारी पडलेले जनावर किमान महिनाभर शेतीच्या कामासाठी उपयोगात येईल, अशी स्थिती नाही. या आजारामुळे जनावरांना प्रचंड अशक्तपणा येतो. सतत लागून असलेला पाऊस अचानक उघडल्याने शेतातील मशागतीचे काम एकाचवेळी सुरू झाले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांपुढे अडचण : बैलजोडी भाड्याने मिळणेही झाले दुरापास्त, ट्रॅक्टर चालेना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतीत कितीही आधुनिक साधनांचा वापर केला असला तरी परंपरागत बैलजोडीला अजूनही १०० टक्के पर्याय नाही. यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावली. अतिरेकी पावसामुळे पिकांची स्थिती नाजूक झाली. १५ दिवसानंतर काही उघाड मिळाली. मात्र या काळात पिकांच्या आंतर मशागतीसाठी लागणारी बैलजोडी मिळणे मुश्कील झाले. लंपी हा संसर्गजन्य आजार जनावरांमध्ये बळावला आहे. या संकटातून जनावरे वाचवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.लंपी हा जनावरांना होणारा त्वचा रोग आहे. हा आजार संसर्गाने फैलावत असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनावरे आजारी पडत आहे. उपचाराने हा आजार पूर्णत: बरा होत असला तरी एकदा आजारी पडलेले जनावर किमान महिनाभर शेतीच्या कामासाठी उपयोगात येईल, अशी स्थिती नाही. या आजारामुळे जनावरांना प्रचंड अशक्तपणा येतो. सतत लागून असलेला पाऊस अचानक उघडल्याने शेतातील मशागतीचे काम एकाचवेळी सुरू झाले. मात्र ओल्या मातीत मशागतीचे काम बैलाशिवाय करता येणे शक्य नाही. इतर कुठलेही यंत्र अशा स्थितीत मशागतीसाठी उपयोगी ठरत नाही. शिवाय आता कपाशी, सोयाबीनची चांगली वाढ झाली आहे. मात्र सततच्या पावसाने पिकांमध्ये गवत मोठ्या प्रमाणात वाढले. शिवाय बुरशीचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी पिकांची आंतरमशागत करणे आवश्यक आहे. या स्थितीत गोठ्यातील बैल लंपी आजाराने ग्रासला आहे. ग्रामीण भागात आता बैलांचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. पशुधन सातत्याने घटत आहे. अशा स्थितीत आंतरमशागतीसाठी बैलजोडी मिळणे मुश्कील झाले आहे. लंपी हा आजार औषधोपचाराने पूर्णत: बरा होणारा असला तरी आजारी जनावरात प्रचंड अशक्तपणा येतो त्यामुळे तो बरेच दिवस कामात येत नाही. संसर्ग थांबविण्यासाठी अशा जनावरांना वेगळे ठेवणे आवश्यक आहे.लंपी त्वचारोग संसर्गाने वाढतो. गोठ्याची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. उपचाराने चार दिवसात हा आजार बरा होतो. आता प्रतिबंधासाठी गोटफॉक्स ही लस मागविली आहे. सध्या आवश्यक औषधीसाठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी अशा जनावरांना स्वतंत्र ठेवणे गरजेचे आहे.- डॉ. राजीव खेरडे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती