सायखेडा येथे कुल्फी विक्रेत्याला ट्रकने चिरडले

By Admin | Updated: April 1, 2015 02:05 IST2015-04-01T02:05:42+5:302015-04-01T02:05:42+5:30

भरधाव ट्रकने दोन झाडांना धडक देवून रस्त्यावरील एका कुल्फी विक्रेत्याला चिरडले. यात तो जागीच ठार झाला.

The Kulfi vendor was crushed by truck in Sikheida | सायखेडा येथे कुल्फी विक्रेत्याला ट्रकने चिरडले

सायखेडा येथे कुल्फी विक्रेत्याला ट्रकने चिरडले

रुंझा : भरधाव ट्रकने दोन झाडांना धडक देवून रस्त्यावरील एका कुल्फी विक्रेत्याला चिरडले. यात तो जागीच ठार झाला. तर एक जण जखमी झाला. ही घटना पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा धरण येथे मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी तब्बल चार तास चक्काजाम केला. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
राजू जनार्दन ठाकरे (४०) रा.सायखेडा असे मृताचे नाव आहे. तर नारायण कोवे (३५) असे जखमीचे नाव आहे. मंगळवारी यवतमाळवरून चंद्रपूरकडे ट्रक एम.एच.४०/वाय-९०६० भरधाव वेगाने जात होता. सायखेडा गावानजीक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण गेले. अनियंत्रीत ट्रक दोन झाडांवर आदळून सायखेडा येथील एका आॅटोमोबाईलच्या दुकानाला जावून धडकला. दरम्यान, रस्त्यावर असलेला कुल्फी विक्रेता राजू ठाकरे ट्रकखाली चिरडला गेला. तर नारायण गंभीर जखमी झाला. जखमीला उमरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, भरधाव वाहनामुळे नेहमीच अपघात होत असल्याने नागरिक संतप्त होतेच. त्यात आज गावातील इसमाचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांच्या संतापात भर पडली. शेकडो नागरिकांनी दुपारी ३ वाजतापासून यवतमाळ-पांढरकवडा मार्गावर चक्काजाम सुरू केला. यामुळे या मार्गावरून जाणारी शेकडो वाहने ठप्प झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चक्काजाम करणाऱ्या नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राळेगाव व यवतमाळवरून दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन, प्रभारी पोलीस निरीक्षक राखी गेडाम घटनास्थळी आले. तब्बल चार तासानंतर नागरिकांनी चक्काजाम मागे घेतला आणि वाहतूक सुरळीत झाली. (वार्ताहर)

Web Title: The Kulfi vendor was crushed by truck in Sikheida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.