एसटी बस, टँकर अपघातात कीर्तनकार ठार, ४६ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 06:00 AM2019-12-20T06:00:00+5:302019-12-20T06:00:11+5:30

वाढोणा येथे मुक्कामी असलेली एम.एच.४०/एन-८४७७ या क्रमांकाची बस नेर येथे परत येत होती. विरूद्ध दिशेने आॅईल टँकर (एम.एच.२९/टी-९२५) येत होता. या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. यात दोनही वाहनांचा पुढील भाग चक्काचूर झाला. बस चिरत गेल्याने हभप रामभाऊ जावळे बाहेर ओढले जाऊन एसटी व टँकरच्या मधात फसले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एसटी चालक मोहम्मद अशपाक मो. अजीज (रा.नेर) यांचे दोनही पाय फ्रॅक्चर झाले.

Kirtankar killed, 46 injured in ST bus accident | एसटी बस, टँकर अपघातात कीर्तनकार ठार, ४६ जखमी

एसटी बस, टँकर अपघातात कीर्तनकार ठार, ४६ जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देनेर-कारंजा रोडवरील घटना : जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : एसटी बस व आॅईल टँकरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार, तर ४६ जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास नेर-कारंजा मार्गावरील आजंती(खाकी) गावाजवळ घडली. रामभाऊ जावळे (७५) रा.मोरगाव जि.अकोला असे मृताचे नाव आहे. ते कीर्तनकार होते. जखमींमध्ये प्रवासी आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अपघातातील १५ रुग्ण १०८ रुग्णवाहिकेद्वारे हलविण्यात आले.
वाढोणा येथे मुक्कामी असलेली एम.एच.४०/एन-८४७७ या क्रमांकाची बस नेर येथे परत येत होती. विरूद्ध दिशेने आॅईल टँकर (एम.एच.२९/टी-९२५) येत होता. या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. यात दोनही वाहनांचा पुढील भाग चक्काचूर झाला. बस चिरत गेल्याने हभप रामभाऊ जावळे बाहेर ओढले जाऊन एसटी व टँकरच्या मधात फसले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एसटी चालक मोहम्मद अशपाक मो. अजीज (रा.नेर) यांचे दोनही पाय फ्रॅक्चर झाले.
जखमींमध्ये सात ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी ब्राह्मणवाडा(पश्चिम), मोझर, सावरगाव(काळे), पांढरी, आजंती आदी गावातील आहे. तसेच जखमी प्रवासी वाढोणा-नेर मार्गावर असलेल्या गावातील आहेत. यातील २० जणांची प्रकृती गंभीर असून २६ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
नेर-कारंजा रस्त्याचे अलीकडेच डांबरीकरण झाले आहे. रस्त्याच्या बाजू मात्र मुरुमाने भरल्या नाही. असमतल झालेल्या या रस्त्यावर बस वळविताना खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगितले जाते.
अपघातातील जखमींना नेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक खोडवे, शंकर भागडकर, नाना घोगडे, पल्लवी गाडगीळवार, दीपक मिसळे, अनिल मोगरे यांनी जखमींवर उपचार केले.

खरडगावचे कीर्तन ठरले अखेरचे
हभप रामभाऊ जावळे हे बुधवारी रात्री खरडगाव येथे भागवत सप्ताहात कीर्तनासाठी आले होते. रात्री मुक्कामानंतर सकाळी मूळ गाव मोरगाव येथे जाण्यासाठी बसने निघाले. चालकाच्या मागेच बसले असल्याने दोन वाहनाच्या मधात फसले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. खरडगावचे कीर्तन त्यांचे अखेरचे ठरले. रामभाऊ जावळे हे अविवाहित होते. त्यांच्या मागे दत्तक घेतलेली मुलगी सुवर्णा भगवान काळे (रा.आळंदी) ही आहे.

Web Title: Kirtankar killed, 46 injured in ST bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात