करण पराेपटे हत्याकांडात दाेन जिल्ह्यांतील आराेपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 05:00 IST2021-06-28T05:00:00+5:302021-06-28T05:00:06+5:30
येळाबारा शिवारातून शनिवारी रात्री बगिरा ऊर्फ आशिष दांडेकर, शुभम बघेल आणि रघू राेकडे, प्रवीण ऊर्फ पिके केराम यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने आराेपींना ४ जुलैपर्यंतची पाेलीस काेठडी सुनावली आहे. या हत्याकांडात पडद्या मागचे सूत्रधार काेण, याचाही शाेध पाेलीस घेत आहेत. ज्यांनी थेट करण पराेपटे याच्यावर हल्ला केला त्याच्याव्यतिरिक्त गुन्ह्यात आणखी काहींचा समावेश आहे.

करण पराेपटे हत्याकांडात दाेन जिल्ह्यांतील आराेपी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : करण पराेपटे हत्याकांडात प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या आराेपींना पाेलिसांनी जेरबंद केले आहे. सोबत घटनेच्या मागील सूत्रधारांचाही शाेध पाेलीस घेत आहे. नागपूरपाठाेपाठ आता अमरावती जिल्ह्यातील आराेपींचाही यात सहभाग असून पाेलीस त्यांच्या मागावर आहेत.
येळाबारा शिवारातून शनिवारी रात्री बगिरा ऊर्फ आशिष दांडेकर, शुभम बघेल आणि रघू राेकडे, प्रवीण ऊर्फ पिके केराम यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने आराेपींना ४ जुलैपर्यंतची पाेलीस काेठडी सुनावली आहे. या हत्याकांडात पडद्या मागचे सूत्रधार काेण, याचाही शाेध पाेलीस घेत आहेत. ज्यांनी थेट करण पराेपटे याच्यावर हल्ला केला त्याच्याव्यतिरिक्त गुन्ह्यात आणखी काहींचा समावेश आहे. अटकेतील आराेपींच्या कबुली जबाबावरून पाेलिसांचा त्या दिशेने तपास सुरू आहे.
हत्याकांडाचे केले पूर्वनियाेजन
भर चाैकात वर्दळीच्या वेळी थेट गाेळीबार करून चाकूहल्ला करण्याची घटना ही अचानक घडलेली नाही. हा गुन्हा करताना आराेपींनी पूर्वनियाेजन केले. काेण काय करणार, हे निश्चित करून हत्या करण्यात आली. त्यामुळे घटनास्थळावर प्रत्यक्ष हल्ला करणारे तिघे असले तरी त्यांना यात मदत करणाऱ्यांची संख्या माेठी आहे. त्यांनाही रेकाॅर्डवर घेण्याचे प्रयत्न पाेलिसांकडून केले जात आहेत.
तिघांनी केला गाेळीबार व चाकुहल्ला
- करण पराेपटे हा स्टेट बँक चाैकात आला असताना त्यांच्या पाळतीवर असलेल्या बगिराने त्याला आवाज देऊन बाेलण्यास थांबविले. नंतर तेथे वाद घातल्याचा देखावा करून शुभम बघेल याने थेट गाेळ्या घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर रघू व बगिराने दातेरी चाकूने पाेट तसेच पाठीवर सपासप वार केले. काेणत्याही परिस्थितीत करणचा जागेवरच खात्मा झाला पाहिजे, अशा इराद्याने हे तिन्ही आराेपी त्याच्यावर तुटून पडले. वर्दळीच्या चाैकात काही मिनिटांत करण पराेपटे याचा गेम खल्लास केला. तेथून हे तिघे दुचाकीने येळाबारा परिसरात आश्रयाला पाेहाेचले. दाेन दिवस मुक्काम करून त्यांचा राज्याबाहेर पसार हाेण्याचा बेत हाेता. मात्र, पाेलिसांच्या सर्तकतेमुळे ते जाळ्यात सापडले.