फक्त मोठ्या घोषणा; सरकार अजूनही गंभीर नाही; यशोमती ठाकूर यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2023 15:20 IST2023-11-30T15:17:43+5:302023-11-30T15:20:02+5:30
अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

फक्त मोठ्या घोषणा; सरकार अजूनही गंभीर नाही; यशोमती ठाकूर यांची टीका
गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. कापूस, तूर पिकं संपूर्ण खराब झालं आहे. सरकारने ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याच आश्वासन दिलं आहे. यावर काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वत्र पाऊस झाला असल्याने सरकारने सदसद विवेक बुद्धीने वागणे गरजेचे आहे, असं मत काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केल आहे. पाऊस सर्वत्र झाला असल्याने नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया देखील काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. सरकार केवळ मोठ्या-मोठ्या घोषणा करतंय. सरकार अजूनही गंभीर नाही आहे, अशी टीका देखील यशोमती ठाकूर यांनी केली आहे.