श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 20:12 IST2026-01-25T20:11:37+5:302026-01-25T20:12:17+5:30
संदीप राऊत / तिवसा सेवाभावी कार्याची शासनाकडून दखल तिवसा : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमचे सरचिटणीस ...

श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
संदीप राऊत / तिवसा
सेवाभावी कार्याची शासनाकडून दखल
तिवसा : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे खासगी सेवक राहिलेले तसेच महाराजांच्या सहवासात राहून जनार्दन बोथे यांनी आपले अवघे आयुष्य गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यासाठी समर्पित केले. राष्ट्रसंतांच्या कार्याचा वारसा आजही ते समर्थपणे चालवत आहे. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयातून शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. तसेच दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात येणाऱ्या लाखो भाविकांचे शिस्तबद्ध नियोजन करण्यात श्री गुरुदेव सेवा मंडळाची ख्याती आहे.
त्यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार हा त्यांच्या नि:स्वार्थ सेवाभावी कार्याची पावती असल्याने लाखो गुरुदेव भक्तांकडून अभिनंदन तथा समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
हा भगव्या टोपीचा गौरव आहे....
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर सेवा मंडळाची वाटचाल आहे. हा कुण्या एका व्यक्तीचा सन्मान नसून श्री गुरुदेव सेवा मंडळाचा व विशेष म्हणजे भगव्या टोपीचा गौरव आहे.
- जनार्दनपंत बोथे, सरचिटणीस श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम