शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

‘जय भीम’च्या गजराने दुमदुमला आसमंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 21:56 IST

निळे ध्वज, निळ्या पताका, निळाची उधळण, जय भीमचा जयघोष आणि स्वागत कमानी यामुळे रविवारी यवतमाळचा संपूर्ण परिसर भीममय झाला होता. निमित्त होते भारतरत्न डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या जयंतीचे. जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निळे ध्वज, निळ्या पताका, निळाची उधळण, जय भीमचा जयघोष आणि स्वागत कमानी यामुळे रविवारी यवतमाळचा संपूर्ण परिसर भीममय झाला होता. निमित्त होते भारतरत्न डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या जयंतीचे.जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली. यवतमाळ शहरात दिवसभर भरगच्च कार्यक्रम पार पडले. बसस्थानक चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. शहरालगतच्या सर्व भागातून आलेल्या बाबासाहेबांच्या चाहत्यांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. यामुळे बसस्थानक चौकात बाबासाहेबांच्या अनुयायांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या ठिकाणी पंचशिल ध्वजारोहण आणि बुद्धवंदना पार पडली. समता सैनिक दलाच्या सैनिकांनी बाबासाहेबांना सलामी दिली. ‘निळी पहाट’ हा भीमगीतांचा कार्यक्रम झाला. अल्पोपहाराचे स्टॉलही लावण्यात आले होते.दुपारी समता बाईक मार्च काढण्यात आला. या बाईक रॅलीमध्ये ५० गावांतील अनुयायी सहभागी झाले होते. या रॅलीचे शहरातील विविध भागात स्वागत करण्यात आले.सायंकाळी पाटीपुरा परिसरातून मुख्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत बाबासाहेबांचे हजारो अनुयायी सहभागी झाले होते. यावेळी जयभीमच्या गजराने आसमंत दुमदुमला. यासोबत निळीच्या उधळणाने संपूर्ण परिसर निळा झाला होता. या रॅलीचे शहरातील विविध भागात स्वागत झाले. स्थानिक बसस्थानक चौकात रॅलीचा समारोप झाला.