शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

कडक इस्त्रीत सुरू झाला नमस्कार अन् रामराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:00 IST

ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की, ‘गावात कुठं फाईट तर कुठं वातावरण टाईट’ अशी स्थिती निर्माण होते. नेत्यांसाठी ग्रामीण भागातील निवडणूक ही सर्वांत प्रतिष्ठेची समजली जाते. आता तर राजकीय पक्षांनी या निवडणुकीत लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या होणार हे निश्चित झाले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होताच कडक इस्त्री केलेले कपडे घालून नेते मतदारांना नमस्कार, रामराम ठोकून मिरवू लागले आहेत.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : कडाक्याच्या थंडीत गावागावांत वाहू लागले निवडणुकीचे उष्ण वारे

विलास ताजनेलोकमत न्यूज नेटवर्क शिंदोला : कोरोनाच्या संकटात रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुन्हा घोषित झाल्या. परिणामी गावपातळीवरचं मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्साह खेड्यापाड्यात दिसून येऊ लागला. साहजिकच कडाक्याच्या थंडीतही ग्रामपंचायत निवडणुकीचे उष्ण वारे वाहू लागले. परिणामी पाच वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र नांदणाऱ्या मित्र, आप्तेष्ट आणि भावाबंधातच नव्हे; तर घराघरात पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आपुलकीपेक्षा अधिक कटुतेची भावना निर्माण होऊ लागल्याचे चित्र गावगाड्यात दिसून येऊ लागले. ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की, ‘गावात कुठं फाईट तर कुठं वातावरण टाईट’ अशी स्थिती निर्माण होते. नेत्यांसाठी ग्रामीण भागातील निवडणूक ही सर्वांत प्रतिष्ठेची समजली जाते. आता तर राजकीय पक्षांनी या निवडणुकीत लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या होणार हे निश्चित झाले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होताच कडक इस्त्री केलेले कपडे घालून नेते मतदारांना नमस्कार, रामराम ठोकून मिरवू लागले आहेत. ‘मी मिरवणार अन् सगळ्यांची जिरवणार’ जणू काही असा विश्वास त्यांच्या वागण्या-बोलण्यात दिसून येत आहे. सदस्य किंवा सरपंचपदासाठी सातवी उत्तीर्णतेची अट घातली आहे. त्यामुळे अनेक पार्टीप्रमुखांना उमेदवार बदलविण्याची वेळ आली आहे. नवीन उमेदवार शोधताना अरे, तू सातवी पास आहेस का? असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्यामुळे खेड्यापाड्यातील लहान मोठ्यांच्या तोंडी अरे भाऊ, ये बाई, तू सातवी पास आहेस का? असा प्रश्न सहजपणे विचारला जातो. एकूणच गावागावांत राजकीय वातावरण तापत आहे. 

अनेक नवतरूण उतरले निवडणुकीच्या रिंगणात  कोरोनामुळे पुणे, मुंबईतील खासगी नोकरी गमावलेले अनेक तरूण मुले-मुली गावात वास्तव्यास आहेत. यापैकी अनेकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची मानसिकता तयार केली आहे. अनेक गावात उच्च शिक्षित मुला-मुलींनी राजकारणात प्रवेश केल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक