लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आयपीएल क्रिकेटचे सामने रंगात असून मोठ्या प्रमाणात सट्टा लावल्या जात आहे. गोपनीय माहितीवरून टोळीविरोधी पथकाने सूरजनगरातील सट्ट्यावर धाड टाकून एक लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये रोख ९० हजार रुपये असून सटोड्याला अटक केली.राजेश विश्वंभर चमेडिया रा.सूरजनगर हा गुरुवारी आयपीएल क्रिकेट सामन्यावर फोनद्वारे सट्टा घेवून पैशाची बाजी लावत असल्याची माहिती मिळाली. यावरून टोळीविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर यांनी सापळा रचून कारवाई केली. सट्टा सुरू असलेल्या घरातील खोलीवर एकाचवेळी पोलिसांनी झडप घातली. तेथून दोन मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, रोख ९० हजार असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात ऋषी ठाकूर, संजय दुबे, गणेश देवतळे, योगेश गटलेवार, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, आशीष गुल्हाने, विनोद राठोड, राज कांबळे, विभावरी ढवस, प्रियंका ढोके यांनी केली. जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई या सिझनमध्ये सूरजनगरात झाली आहे.
आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 22:14 IST
आयपीएल क्रिकेटचे सामने रंगात असून मोठ्या प्रमाणात सट्टा लावल्या जात आहे. गोपनीय माहितीवरून टोळीविरोधी पथकाने सूरजनगरातील सट्ट्यावर धाड टाकून एक लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये रोख ९० हजार रुपये असून सटोड्याला अटक केली.
आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड
ठळक मुद्देदोन लाखांचा मुद्देमाल : सूरजनगरातील सट्टा घेणाऱ्याला अटक