राकाँतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:16 IST2018-07-04T22:14:06+5:302018-07-04T22:16:30+5:30
जिल्हा परिषदेमील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. या वादात थेट गटनेताच बदलविण्यात आला आहे.

राकाँतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेमील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. या वादात थेट गटनेताच बदलविण्यात आला आहे.
६१ सदस्यीय जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे ११ सदस्य निवडून आले. यापैकी १० सदस्य पुसद विभागातून विजयी झाले. मात्र उर्वरित जिल्ह्यातून केवळ एकमेव सदस्य विजयी झाल्यानंतरही त्यांना प्रथम गटनेता व नंतर बांधकाम सभापतिपद देण्यात आले. यामुळे पुसद विभागातील सदस्यांमध्ये सुरुवातीपासूनच खदखद होती. त्यातूनच १० सदस्यांनी गटनेता बदलविण्याचा प्रस्ताव दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मंजुरी दिल्यानंतर गटनेतेपद पुसद विभागातील बाळा पाटील यांच्याकडे गेले. यामुळे राष्ट्रवादीतील वाद विकोपास गेल्याचे स्पष्ट झाले. यातून मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेत राष्ट्रवादीचे बांधकाम सभापती व इतर सदस्यांमध्ये चांगलाच शाब्दीक वाद झाला. पक्षातील अंतर्गत धुसफूस यानिमित्ताने बाहेर येऊन वाद चव्हाट्यावर आल्याने नेत्यांची पकड सैल झाल्याचे स्पष्ट झाले.
सभापती सत्तेत, सदस्य विरोधात
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्षाची जिल्हा परिषदेत सत्ता आहे. राष्ट्रवादीचे निमिष मानकर बांधकाम सभापती आहे. मात्र उर्वरित दहाही सदस्य सुरुवातीपासून सत्तेच्या विरोधात बोलताना दिसून येत आहे. यामुळे एकाच पक्षाच्या सदस्यांमध्ये विरोधाभास निर्माण झाला आहे. सभापती सत्तेत आणि सदस्य विरोधात, अशी स्थिती निर्माण झाली आहे.