शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर पीक कर्ज उचल

By admin | Updated: August 19, 2015 02:44 IST

आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर पीक कर्जाची उचल करून रक्कम हडपल्याचा आरोप आदिवासी विकास परिषदेच्या पुसद शाखेने उपविभागीय पोलीस ...

पुसद : आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर पीक कर्जाची उचल करून रक्कम हडपल्याचा आरोप आदिवासी विकास परिषदेच्या पुसद शाखेने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. या प्रकरणी सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखा पुसदचे व्यवस्थापक आणि बँकेतील एका दलालाविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पुसद येथील सेंट्रल बँकेच्या शाखेतून तालुक्यातील चोंढी येथील प्रल्हाद गुहाडे यांच्या नावावर १ लाख २० हजार रुपये, मनोज चव्हाण १० हजार, आरेगाव येथील प्रल्हाद जमघाडे ५० हजार, काऱ्होडचे संतोष ढगे १ लाख ८० हजार, कृष्णा ढगे १ लाख ७५ हजार, येहळा येथील संभाजी कुरुडे १ लाख ७० हजार, मनोहर ढगे ८८ हजार, चोंढी येथील नारायण व्यवहारे ८० हजार, रामचंद्र पठारे ८० हजार, धरमवाडी येथील राघोजी कुरुडे १ लाख २४ हजार, नारायण डाखोरे एक लाख, विक्रम कुरुडे ९५ हजार, बीबी येथील बाबाराव नथ्थू १ लाख २७ हजार, श्रीराम गडदे १ लाख ६९ हजार रुपये पीक कर्ज परस्पर उचलल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. तालुक्यातील जवळपास ४० च्यावर शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे. आदिवासी शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे पैसे बँकेचे व्यवस्थापक सिसोदिया आणि दलाल धीरज ठाकूर रा. धुंदी यांनी संगनमताने काढल्याचा आरोप आहे. बँकेत शेतकरी नीलचा दाखला घेण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. यामुळे शेतकरी आश्चर्यचकित झाले. पुसद तालुक्यातील या आदिवासी शेतकऱ्यांनी न उचललेले कर्ज कसे भरायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्ज उचलून परस्पर रक्कम हडपणाऱ्यांकडूनच ही रक्कम वसूल करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर आदिवासी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश सिडाम, जिल्हा संघटक रामकृष्ण चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष रमेश उमाटे, तालुका उपाध्यक्ष मारोती आगोसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही तर आदिवासी विकास परिषद आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)