राळेगाव ठाणेदाराविरुद्ध आर्णीत निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:15 PM2017-12-29T23:15:20+5:302017-12-29T23:15:31+5:30

राळेगावचे ठाणेदार संजय खंदाडे यांच्यावर कठोर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा येथील युवकांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

Inquiry against Ralegaon Thane | राळेगाव ठाणेदाराविरुद्ध आर्णीत निवेदन

राळेगाव ठाणेदाराविरुद्ध आर्णीत निवेदन

Next
ठळक मुद्देराळेगावचे ठाणेदार संजय खंदाडे यांच्यावर कठोर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : राळेगावचे ठाणेदार संजय खंदाडे यांच्यावर कठोर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा येथील युवकांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
राळेगाव येथील उमेश करपते या आदिवासी तरुणाला ठाणेदारांनी विनाकारण मारहाण केल्याचा आरोप आहे. ठाणेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. तरुणांनी आर्णी येथील नायब तहसीलदार आर.बी. मांडेकर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. यावेळी नीलेश मस्के, अंकुश प्रकाश राजूरकर, रवींद्र राठोड, राजेश बुक्कावार, अनिल राठोड, राहुल मुजमुले, माणिक राठोड, अनिल चव्हाण, सचिन आत्राम, अमित वानखडे, देवीदास वानखडे, प्रज्वल राठोड, अक्षय मानकर, दिनेश पसारे आदी उपस्थित होते.

Web Title: Inquiry against Ralegaon Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.