उमरखेडमध्ये वीज अभियंत्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 21:57 IST2018-10-04T21:57:16+5:302018-10-04T21:57:45+5:30
वीज वितरण कंपनीची थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेले सहाय्यक आभियंता जीवन गेडाम व पथकाला मारहाण करण्यात आली. यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारून आरोपीच्या अटकेची मागणी केली.

उमरखेडमध्ये वीज अभियंत्याला मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : वीज वितरण कंपनीची थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेले सहाय्यक आभियंता जीवन गेडाम व पथकाला मारहाण करण्यात आली. यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारून आरोपीच्या अटकेची मागणी केली.
अभियंता जीवन गेडाम आणि पथकातील तंत्रज्ञ ज्ञानेश्वर मुंडे, शेख इरफान शेख मुसा हे बुधवारी दुपारी महात्मा फुले वार्डातील उलंगवार यांच्या घरी ११ हजार ३७० रुपये वसुलीसाठी गेले होते. त्यावेळी श्रीनिवास उलंगवार, गोपी उलंगवार व इतर दोघांनी त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याविरूद्ध तक्रारीनंतर तत्काळ गुन्हा दाखल झाला. मात्र अद्याप आरोपींना अटक झोली नाही. आरोपीना अटक न झाल्याने गुरूवारी वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. आरोपींना तत्काळ अटक करून वीज कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी सबॉर्डिनेट इंजिनिअर असोसिएशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, एम.एस.ई.बी. वर्कस फेडरेशन, वीज कामगार महासंघ, मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटना, इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन आदींच्या कृती समितीने उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच ठाणेदारांना निवेदन दिले. आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत सर्व अभियंते, कर्मचारी कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती दिली.